मुंबई : अक्षय्य तृतीयेच्या  (Akshaya Tritiya 2022) आधी सोन्या-चांदीच्या (Gold Silver Price Today) दरात  मोठी घट झाली आहे. जागतिक बाजारातून मिळालेल्या संकेतानुसार एमसीक्स आणि भारतीय सोने बाजारात सोनं आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे. (gold silver rate today 2 may 2022 know gold 22 and 24 carat rates mumbai pune)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आठवड्यातील कामकाजाच्या पहिल्या दिवशी मल्टी कमोडीटी एक्सचेंजमध्ये जून वायदा सोन्याच्या दरात दुपारी 12 वाजता 1.19 टक्क्यांनी घट झाली. त्यामुळे सोन्याचं दर  51 हजार 136 रुपये इतका झाला. 


तसेच जुलै वायदा चांदीचा भाव 1.52 टक्क्यांनी घसरून 63 हजार 370 रुपयांवर आला. देशात उद्या (3 मे) अक्षय्य तृतीयेचा सण साजरा केला जाणार आहे. अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहर्तावार सोने-चांदी खरेदी करण्याकडे अनेकांचा ओढा असतो. त्यामुळे अशा परिस्थितीत तुम्ही किंमतीतील घसरणीचा फायदा घेत सोने-चांदी खरेदी करु शकता.


चांदीच्या दरातही घट


आयबीजीएनुसार, सोमवारी सकाळी सोन्या-चांदीच्या दरातही घट झाली. शुक्रवारी संध्याकाळी सोन्याच्या  24 कॅरेटचा दर हा 52 हजार 55 रुपये इतका  होता. तोच दर आज (2 मे) 51 हजार 406 रुपये प्रति 10 ग्रॅमवर जाऊन पोहचला आहे. 


तर 22 कॅरेट सोन्याचा दर 51 हजार 200 रुपये आणि 20 कॅरेट सोन्याचा दर हा 47 हजार 8 रुपये इतका आहे. तसेच 999 शुद्धतेची चांदीचे दर हे 64 हजार 774 इतके होते. या दरात घट होऊन तो चांदीचा दर आता 62 हजार 820  रुपये प्रति किलो इतका झाला आहे.  


मुंबईतील सोन्याचा 22 आणि 24 कॅरेटचा आजचा दर


मुंबईतील सोन्याच्या आजच्या 22 आणि 24 कॅरेटच्या दरात 1 मे च्या तुलनेत मोठी घट झाली आहे. मुंबईत 22 आणि 24 कॅरेटचे दर हे अनुक्रमे 47 हजार 200 आणि 51 हजार 510 रुपये प्रति तोळा इतके आहेत. तर 1 मे ला सोन्याचा 22 आणि 24 कॅरेटचा दर हा अनुक्रमे 48 हजार 390 आणि 52 हजार 790 इतका होता.