मुंबई : Gold Silver Price Today : देशभरात 7 ऑक्टोबर रोजी नवरात्रीच्या उत्सवाला सुरूवात झाली आहे. नवरात्रीच्या एक दिवस अगोदर सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. दिल्ली बुलियन मार्केट (Delhi bullion market) मध्ये 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा आजचा 6 ऑक्टोबर 2021 चा दर 226 रुपयांनी घसरण झाली आहे. 10 ग्रॅम सोन्याचा दर 45618 रुपये आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंटरनॅशनल मार्केटमध्ये सोन्याची किंमत कमी झाली आहे. सोन्याच्या दराप्रमाणेच चांदीचा दर देखील कमी झाला आहे. बुलियन मार्केटमध्ये चांदीचा दर 462 रुपयांनी कमी झाला असून आता प्रति किलो 59341 रुपये आहे. या अगोदर ट्रेडिंग सेशनमध्ये सोन्याचा दर 45844 रुपये आणि चांदीचा दर 59803 प्रति किलो आहे. 


HDFC सिक्युरिटीचे सीनियर एनालिस्ट तपन पटेल यांचं म्हणण आहे की, न्यूयॉर्क कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याच्या दरात 0.72 टक्के घसरण झाली आहे. दिल्ली सराफा बाजारात सोन्याच्या 24 कॅरेटमध्ये 226 रुपयांची घसरण झाली आहे. 


आंतरराष्ट्रीय बाजारात कॉमेक्सवर सोने 0.72 टक्क्यांनी घसरून 1,747 डॉलर प्रति औंस होते. तर चांदीचे भाव 22.35 डॉलर प्रति औंसवर स्थिर आहेत. तपन पटेल यांचे म्हणणे आहे की डॉलरची मजबुती आणि अमेरिकन बॉण्डच्या उत्पन्नातील तेजी दरम्यान सोन्याच्या किमतींमध्ये घसरण झाली.


स्पॉट ट्रेडिंगसोबतच सोन्याच्या किमती फ्युचर्स ट्रेडमध्ये घसरल्या. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (एमसीएक्स) वर मंगळवारी सोन्याचा वायदा 126 रुपयांनी घसरून 46,631 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला.