मुंबई : जागतिक बाजारातून मिळणाऱ्या संमिश्र संकेतांमुळे आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी सोन्याच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. आजही सोन्याचा भाव 51,000 च्या खाली आहे. याशिवाय चांदीच्या दरातही घसरण नोंदवण्यात आली. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, सराफा बाजारात सोने 50,803 रुपये झाले आहे, तर चांदी 607 रुपयांनी स्वस्त होऊन 54,402 रुपये प्रति किलो झाली आहे. 


जाणून घ्या आज सोन्या-चांदीचे दर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर दुपारपर्यंत सोन्याचा भाव 91 रुपयांनी घसरून 50,553 रुपयांवर तर MCX वर चांदीचा भाव दुपारी 328 रुपयांनी घसरून 54,803 रुपयांवर व्यवहार करत आहे.


मुंबईत आज सोन्याचे दर 51160 रुपये प्रति तोळे इतके होते तर, चांदीचे दर 54900 रुपये इतके होते.


तज्ज्ञांचे मत


युरोप आणि भारतासह जगभरात व्याजदर वाढल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. डॉलरच्या वाढत्या दबावामुळे सोन्यात आणखी घसरण होऊ शकते. येत्या काही दिवसांत सोन्याच्या दरात आणखी घसरण होऊन ती 49 हजार रुपयांपर्यंत येऊ शकते.