मुंबई : Gold-Silver Rate धनत्रयोदशी आणि दिवाळीपूर्वी सोने खरेदी करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. दिवाळी आधी सोने- चांदीच्या दरात (Gold-Silver Rate)  मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे आता दिवाळीत स्वस्तात सोने खरेदी (Gold Price) करता येणार आहे. नेमकी सोने-चांदीच्या दरात किती घसरण झालीय? आजचे दर काय आहेत, हे जाणून घेऊयात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे ही वाचा : ऑक्टोंबरच्या पुढच्या 15 दिवसात इतक्या दिवस बँका बंद राहणार,जाणून घ्या सुट्ट्यांची यादी


सोन्याच्या दरात घसरण 


डॉलरच्या वाढत्या निर्देशांकामुळे आणि आगामी FOMC बैठकीत यूएस फेड दरात वाढ झाल्याची अटकळ, यामुळे सोन्याच्या किमती  (Gold Price) आठवड्याभरात दबावाखाली राहिल्या. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर शुक्रवारी सोन्याचा दर 50 हजार 280 प्रति 10 ग्रॅमवर​​बंद झाला. काल इंट्राडे ट्रेडमध्ये सोन्याची किंमत 600 रूपये प्रति 10 ग्रॅमच्या आसपास मोडली होती. तर साप्ताहिक आधारावर, MCX सोन्याने 1 हजार 719 प्रति 10 ग्रॅम किंवा 3.30 रुपयांचा तोटा नोंदवला. स्पॉट मार्केटमध्ये शुक्रवारी सोन्याचा भाव (Gold-Silver Rate) 1.33 टक्क्यांनी घसरून 1 हजार 643 डॉलर प्रति औंस झाला.


चांदीचे दर किती? 


IBJA नुसार, सराफा बाजारात गेल्या एका आठवड्यात सोने 51 हजार 120 रुपयांवरून 50 हजार 438 रुपयांपर्यंत घसरले. म्हणजेच पाच दिवसांत सोन्याचा भाव 682 रुपयांनी घसरला आहे. त्याचवेळी, आजचा चांदीचा भाव (Silver Price) एका आठवड्यात सुमारे 3 हजार 000 रुपयांनी तुटला आहे. या दरम्यान चांदीचा भाव 58 हजार 949 रुपयांवरून 56 हजार 042 रुपये किलो झाला. म्हणजेच या आठवड्यात चांदी 2 हजार 907 रुपयांनी स्वस्त झाली आहे.


'या' कारणामुळे सोने घसरले? 


कमोडिटी मार्केट तज्ज्ञांच्या मते, या आठवड्यात सोन्याच्या दरात (Gold Price) घसरण होण्याचे प्रमुख कारण म्हणजे डॉलर निर्देशांकातील वाढ आहे. तथापि, यूएस सीपीआय डेटाने पिवळ्या धातूंच्या किमतीत काही प्रमाणात दिलासा दिला. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, अमेरिकन डॉलरच्या संदर्भात भीतीच्या भावनेमुळे लोक डॉलरमध्ये सोन्याची अदलाबदल करत आहेत.


तसेच मजबूत यूएस डॉलरच्या पाठीमागे सोन्याच्या किमती (Gold Price) खाली राहण्याची अपेक्षा आहे आणि ते $1,640 ते $1,700 प्रति औंस या श्रेणीत व्यापार करू शकतात. जर $1,640 च्या पातळीच्या वर ब्रेक असेल तर, स्पॉट गोल्डची किंमत $1,600 च्या पातळीवर जाऊ शकते. MCX वर दिवाळीपर्यंत सोन्याचा भाव 50 हजार 200 ते 51 हजार 500 रुपयांच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे.


धनत्रयोदशी आणि दिवाळीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात (Gold-Silver Rate) मोठी घसरण झाली आहे. आठवडाभरात सोने 1700 रुपयांनी तर चांदी 3000 रुपयांनी स्वस्त झाली आहे. त्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे.