Gold and Sliver Price : सध्या लग्नसराईचा मोहोल सुरू आहे त्यातून आता लग्नखरेदीच्या लिस्टमध्ये सर्वात पहिल्या (Gold Price in Wedding Season) क्रमांकावर तुम्ही सोनं खरेदीला प्राधान्य द्या. कारण आता सोन्याचे दर हे मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. सोन्याच्या दरात कालच्या बाजारभावाप्रमाणे 220 रूपयांची घट झालेली पाहायला मिळते आहे. त्यामुळे आता तुम्ही सोन्याची खरेदी जोमानं करू शकता. मार्च आणि एप्रिल महिन्यात मोठ्या प्रमाणात सोन्याच्या दरात वाढ झाली होती. त्यामुळे ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले होते. परंतु आता सोन्याच्या भावात (Gold Price Decreases) मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुडरिटर्न्सच्या वेबसाईटनुसार, आज (29th April 2023) शुद्ध सोन्याचे दर हे 60,820 रूपये प्रति तोळा इतके आहेत तर 22 कॅरेट सोन्याचे दर हे 55,750 रूपये प्रति तोळा इतके आहेत. त्यामुळे अक्षय्य तृतीयेच्या मानाने सोन्याच्या दरात लक्षणीय घट झाली आहे. या महिन्यापासून सोन्याच्या दरात लक्षणीय वाढ आणि घट झाली आहे असं म्हणायला हरकत नाही. मार्च महिन्यात ऐन लग्नसराईत सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली होती. परंतु एप्रिल महिन्यापासून आणि खासकरून अक्षय्य तृतीयेनंतर सोन्याच्या दरात मोठी घसरण होते आहे. त्यामुळे ग्राहकांसाठी हे एक समाधानकारक चित्र आहे. परंतु अद्यापही सोन्याचे दर हे 60 हजारांच्या खाली आलेले नाहीत. 


सोन्याच्या दरात या दोन महिन्यात मोठी वाढ झालेली आहे. त्यामुळे ग्राहकांसाठी ही मोठी अपडेट (Latest Update in Gold Price) आहे. त्यातून आता पावसाळा सुरू होणार आहे तेव्हा सोन्याच्या किमती या कशा असतील याकडेही सगळ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे. यंदा लग्नसराईचा मुहूर्त आहे तेव्हा सगळीकडेच सोनं चांदी खरेदी करण्याची घाई सूरू झालेलीही असेल. 


लग्नसराईत सोन्याच्या दरात घट


गेल्या दहा दिवसांमध्ये पाहिले तर सोन्याच्या दरात लक्षणीय घट आहे. परंतु सोनं हे अजूनही 60 हजाराच्या वरच आहे. गेल्या दहा दिवसात सोन्याचे भाव हे 60,927 रूपये प्रति तोळा आहे. अक्षय्य तृतीयेनंतर शुद्ध सोन्याचे दर हे घटले आहेत. काल शुद्ध सोन्यचे दर हे 60 हजार 820 रूपये इतके होते तर 22 कॅरेट सोनं हे 55,750 रूपये इतके होते. आज या दोन्ही किंमतींमध्ये घट झालेली नाही वा वाढ झालेली नाही. 


काय आहेत चांदीच्या किमती? 


आज चांदीच्या दरात सोन्याप्रमाणे फारशी वाढ नाही. 10 ग्रॅम चांदी आज 762 रूपये आहे तर 100 ग्रॅम चांदी हे 7620 रूपये आहे तर 1 किलो चांदीचे दर हे आज 76200 रूपये इतके आहेत. काल ही किंमत 300 रूपयांनी घटली होती.