मुंबई :  गरमागरम वाफाळता चहा (Tea) हा कोट्यवधी लोकांचा शौक.  दिवसातून चहाचे 2-3 कप रिचवल्याशिवाय अनेकांना चैन पडत नाही. त्यात काही शौकीन तर असे असतात की कडक आणि मसालेदार चहासाठी वाट्टेल ती किंमत मोजायला तयार असतात. त्यामुळेच मग उत्तम चहापत्तीला सोन्याचा भाव येतो. आसाममध्ये चहाच्या लिलावादरम्यान गोल्डन पर्लच्या एक किलो चहापत्तीला (golden pearl tea) तब्बल 99 हजार 999 रुपयांचा भाव मिळालाय. विशेष म्हणजे दोन महिन्यांत पुन्हा एकदा चहाची विक्रमी दरानं विक्री झाली आहे. (golden pearl tea leaves fetches 99 thousand 999 ruppes kg in auction at assam)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चहाला लाखाचा भाव


गुवाहाटी चहा लिलाव केंद्रामध्ये चहापत्तीच्या लिलाव करण्यात आला. यावेळी आसाम टी ट्रेडर्स कंपनीनं गोल्डन पर्ल चहासाठी 1 लाखाची बोली लावली. याआधी डिसेंबरमध्ये 'मनोहारी गोल्ड टी'च्या चहापत्तीला एवढाच भाव मिळाला होता. गुवाहाटीचे व्यापारी सौरभ टी ट्रेडर्सनी तेव्हा विक्रमी बोली लावली होती. टी असोसिएशन ऑफ इंडियाच्या आसाम विभागाचे सचिव दीपांजोल डेका यांनी विक्रमी दराचं कारण सांगितलंय.



गोल्डन पर्ल नावाचा हा हँडमेड टी म्हणून प्रचलित आहे. ही चहाची अत्यंत नाजूक व्हरायटी आहे. याचं उत्पादन दिब्रुगड विमानतळाजवळ लाहोवाल इथल्या नाहोरचुकबारी इथे घेण्यात आलंय. हा चहाचा एक दुर्मीळ प्रकार आहे, असं डेका यांनी सांगितलं.


आसाम चहानं 2019 मध्ये 50 हजार तर 2021 मध्ये 75 हजारांचा विक्रम नोंदवला होता.  आता तर व्यापाऱ्यांनी हा दर सहा आकड्यांवर नेलाय. चहाचा शौक अनेकांना असतो. मात्र गोल्डन पर्लचा चहा प्यायचा असेल तर तुम्हालाही लाखो मोजावे लागतील.