नवी दिल्ली : नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक गुडन्यूज आहे. कर्मचारी भविष्य निधीवर (ईपीएफ) २०१८- २०१९ या आर्थिक वर्षासाठी ८.६५ टक्के इतके व्याज मिळणार आहे. कारण 'ईपीएफओ'ने घेतलेल्या निर्णयाला केंद्रीय अर्थ मंत्रालयाने तात्काळ मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता तुमच्या पीएफवर ८.६५ टक्के व्याज मिळणार आहे. या निर्णयाचा फायदा सुमारे ६ कोटी कर्मचाऱ्यांना होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्रीय कामगार राज्यमंत्री संतोषकुमार गंगवार यांच्या अध्यक्षतेखालील 'ईपीएफओ'च्या केंद्रीय विश्वस्त मंडळाने चालू आर्थिक वर्षासाठी ईपीएफ व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. गेल्या तीन वर्षांतील ही पहिली व्याजदरवाढ ठरली आहे.



केंद्रीय अर्थ मंत्रालयांतर्गत वित्तीय सेवा विभागाने चालू आर्थिक वर्षासाठी ईपीएफ व्याजदर ८.६५ इतका करण्यास 'ईपीएफओ'ला हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे चांगले व्याज मिळणार आहे. २०१५-२०१६ या आर्थिक वर्षात ८.८ टक्के इतका व्याजदर होता. तो २०१६-२०१७ मध्ये ८.६५ टक्क्यांवर आणण्यात आला. २०१७-१८ मध्ये तो कमी करण्यात आला. तो ८.५५ टक्के कमी करण्यात आला. आता पुन्हा यात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे ईपीएफ धारकांना मोठा दिलासा मिळणार आहे.