7th pay commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकार मोठी खूशखबर देणार आहे. आता कर्मचाऱ्यांचे घरभाडे भत्ता (HRA) 3 टक्क्यांनी वाढणार आहे. तसेत कोरोनामुळे सरकारने दीड वर्षांपर्यंत महागाई भत्ता (DA) दिला नव्हता. पण तो देखील आता 17 टक्क्यांवरून 28 टक्के करण्यात आलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मीडिया रिपोर्टनुसार, ऑगस्ट महिन्यात सरकारने HRA 3 टक्के वाढवून मूळ वेतनाच्या 25 टक्के केली आहे. केंद्र सरकारने आदेश जारी करताना म्हटले आहे की, सरकारी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनाच्या आधारावर घरभाडे भत्ता आणि डीए वाढवण्यात यावा. नियमांनुसार, HRA वाढविण्यात आले आहे कारण DA 25%पेक्षा जास्त आहे. या कारणास्तव, केंद्र सरकारने HRA वाढवून 27%करण्याचा निर्णय घेतला आहे.


7 जुलै 2017 रोजी, विभागाने एक आदेश जारी केला होता ज्यामध्ये म्हटले होते की जेव्हा DA 25%पेक्षा जास्त असेल तेव्हा HRA मध्ये देखील सुधारणा केली जाईल. 1 जुलैपासून महागाई भत्ता 28%पर्यंत वाढला आहे, त्यामुळे आता HRA मध्ये देखील सुधारणा करणे आवश्यक आहे.


शहराच्या श्रेणीनुसार 27 टक्के, 18 टक्के आणि 9 टक्के एचआरए दिले जात आहे. ही दरवाढ DA सह 1 जुलै 2021 पासून लागू झाली आहे. घर भाडे भत्ता (HRA) ची श्रेणी X, Y आणि Z वर्ग शहरांनुसार आहे. याचा अर्थ असा आहे की, केंद्रीय श्रेणीतील जे X वर्गात येतात त्यांना आता दरमहा 5400 रुपयांपेक्षा जास्त HRA मिळेल. यानंतर, Y वर्गातील कर्मचाऱ्यांना दरमहा 3600 रुपये आणि नंतर Z वर्गातील कर्मचाऱ्यांना 1800 रुपये दरमहा मिळतील.


7 व्या वेतन आयोगानुसार केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचे किमान मूलभूत वेतन 18,000 रुपये आहे. सध्या, खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन 15000 रुपयांपासून सुरू होते. 18,000 रुपयांच्या या मूळ पगारावर, केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना जून 2021 पर्यंत 17% दराने 3060 रुपये डीए मिळत होता. जुलै 2021 पासून केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना 28 टक्के डीए दराने 5040 रुपये दरमहा मिळतील. आता कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन 1980 रुपयांनी वाढले.