मुंबई : भारतात राहणाऱ्या विदेशी नागरिकांसाठी एक मोठी आणि चांगली बातमी आहे. आता भारतात राहणाऱ्या विदेशी नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस घेता येणार आहे. सोमवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून याला परवानगी देण्यात आलेली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे आता भारतात राहणारे विदेशी नागरिक CoWIN पोर्टल नोंदणी करत कोरोना प्रतिबंधक लस घेऊ शकतात. कोविड - 19 पासून संरक्षण मिळावं यासाठी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने भारतात राहणाऱ्या परदेशी नागरिकांना लस प्राप्त करण्यासाठी कोविन पोर्टलवर नोंदणी करण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे.


CoWIN पोर्टलवर नोंदणी करण्याच्या हेतूने परदेशी नागरिक त्यांचा पासपोर्ट त्यांचा ओळखपत्र म्हणून वापरू शकतात. एकदा त्यांची या पोर्टलवर नोंदणी झाल्यावर त्यांना लसीकरणासाठी स्लॉट मिळेल.


हा उपक्रम भारतात राहणाऱ्या परदेशी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आहे. केंद्र सरकारचं हे पाऊल हे कोविड -19 विषाणूचा होणारा प्रसार रोखण्यास मदत करेल.


दरम्यान देशातील 37 जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसतायत. यापैकी केरळमध्ये जास्तीत जास्त 11 जिल्ह्यांचा समावेश आहे. गेल्या आठवड्यात, केरळमधून 51.51% प्रकरणं नोंदवण्यात आली होती. त्यासाठी प्रत्येकाने हे समजून घेणं आवश्यक आहे की, कोरोनाच्या दुसरी लाट येणं ही मोठी समस्या नाही. त्याचा प्रसार हा एक मोठा मुद्दा आहे. म्हणूनच प्रत्येकाने खबरदारी घेतली पाहिजे, असं सरकारकडून आवाहन करण्यात आलंय.