एसबीआयकडून ग्राहकांसाठी खुशखबर, ही सेवा झाली स्वस्त
ऑक्टोबर महिन्यात भारतीय स्टेट बँकेने मिनिमम बॅलन्सची मर्यादा कमी केल्यानंतर ग्राहकांसाठी आणखी एक खुशखबर आणलीये. एसबीआयने ग्राहकांसाठी आता ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करताना लागणारे चार्ज कमी केलेत.
नवी दिल्ली : ऑक्टोबर महिन्यात भारतीय स्टेट बँकेने मिनिमम बॅलन्सची मर्यादा कमी केल्यानंतर ग्राहकांसाठी आणखी एक खुशखबर आणलीये. एसबीआयने ग्राहकांसाठी आता ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करताना लागणारे चार्ज कमी केलेत.
फंड ट्रान्सफरसाठी आयएमपीएस(IMPS) चा वापर करणाऱ्यांना एसबीआयने हे गिफ्ट दिलेय. बँकेने या सुविधेसाठी लागणाऱ्या चार्जेसवर तब्बल 80 टक्क्यांपर्यंत कपात केली आहे.
जाणून घ्या नवे चार्जेस
एसबीआयनुसार जर तुम्ही आयपीएसद्वारे 1000 हून कमी रक्कम ट्रान्सफर करत असाल तर तुम्हाला यासाठी कोणतेही चार्जेस द्यावे लागणार नाहीत.
1001 ते 10 हजार रुपयांदरम्यान तुम्ही पैसे ट्रान्सफर करत असाल तर तुम्हाला केवळ एक रुपया चार्ज द्यावा लागेल.
10 हजार ते एक लाख रुपयांपर्यंतची रक्कम ट्रान्सफर करायची असेल तर दोन रुपये चार्जेस द्यावे लागतील
तसेच एक लाख रुपये ते दोन लाखांपर्यंतची रक्कम आयएमपीएसद्वारे ट्रान्सफर करत असाल तर तुम्हाला तीन रुपये चार्जेस द्यावे लागतील.
याआधी एसबीआयने बचत खात्यांमधील मिनिमम बॅलन्सची मर्यादा 5 हजार रुपयांवरुन 3 हजार रुपयांवर आणली होती. बँकेने हा बदल मेट्रो शहरांसाठी केला होता.
आयएमपीएस(IMPS) अर्थात immediate payment service च्या मदतीने बँकिंग युजर्स 24 तास आणि आठवड्याचे सातही दिवस कोणत्याही वेळेस फंड ट्रान्सफर करु शकतात.