सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, या राज्यात निवृत्तीचे वय ६२ वर्षे
सरकारी कर्मचाऱ्यासाठी एक मोठी खुशखबर आहे. मध्य प्रदेशमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय ६२ वर्षांपर्यंत करण्यात आलेयय. पदोन्नतीमध्ये आरक्षण व्यवस्थेमुळे सामान्य वर्गातील कर्मचाख्यांना पदोन्नती मिळत नाही. हे लक्षात घेता राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याच्या सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षांवरुन वाढवून ६२ वर्षे करण्यात आलेय. दरम्यान, पुढील वर्षात होणाऱ्या विधानसभा निवडणुका लक्षात घेता हा निर्णय़ घेतल्याचे लोकांचे म्हणणे आहे. कर्मचाऱ्यांना खुश कऱण्यासाठी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ही घोषणा केलीये.
भोपाळ : सरकारी कर्मचाऱ्यासाठी एक मोठी खुशखबर आहे. मध्य प्रदेशमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय ६२ वर्षांपर्यंत करण्यात आलेयय. पदोन्नतीमध्ये आरक्षण व्यवस्थेमुळे सामान्य वर्गातील कर्मचाख्यांना पदोन्नती मिळत नाही. हे लक्षात घेता राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याच्या सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षांवरुन वाढवून ६२ वर्षे करण्यात आलेय. दरम्यान, पुढील वर्षात होणाऱ्या विधानसभा निवडणुका लक्षात घेता हा निर्णय़ घेतल्याचे लोकांचे म्हणणे आहे. कर्मचाऱ्यांना खुश कऱण्यासाठी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ही घोषणा केलीये.
प्रत्येक कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ
एका कार्यक्रमाच शिवराज सिंग चौहान यांनी ही घोषणा केलीये. राज्य सरकारने वरिष्ठतेनुसार मिळणाऱ्या पदोन्नतीचा लाभ प्रत्येक कर्मचाऱ्याला मिळावा यासाठी सेवानिवृत्तीचे वय दोन वर्षांनी वाढवण्यात आलेय. दरम्यान आता कर्मचारी ६०व्या नव्हे तर ६२व्या वर्षी निवृत्त होणार.
दबावामध्ये घेतला हा निर्णय
कर्मचारी संघटना गेल्या अनेक वर्षांपासून ही मागणी करतेय. अनेक संघटनांनी यासाठी आंदोलनेही केलीत. त्यामुळे दबाव लक्षात घेता हा निर्णय़ घेण्यात आलाय.
कर्मचाऱ्यांना फायदा
सेवानिवृत्तीचे वय ६० वरुन ६२
४० टक्के कर्मचाऱ्यांना होणार फायदा
मध्य प्रदेशात डॉक्टरांच्या निवृत्तीचे वय ६५ वर्षे
नर्सेसच्या निवृत्तीचे वय ६२ वर्षे
चौथ्या श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय
शिक्षकांच्या निवृत्तीचे वय ६२ वर्षे
कर्मचाऱ्यांच्या संख्येतही झाली कपात