Free Ration Scheme : आता मार्च 2022 पर्यंत मिळणार मोफत रेशन... केंद्र सरकारच्या योजनेतील कालावधीत वाढ
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ही माहिती दिली आहे.
मुंबई : देशात कोरोनाचा वाढता प्रभाव पाहाता मार्चमध्ये लॉकडाऊन लावण्यात आले होते, ज्यामुळे सगळ्याच गोष्टी जागच्या जागी थांबल्या होत्या. यामुळे कोणालाही घरातून बाहेर पडता येत नव्हते. परंतु ज्या लोकांचे पोट दिवसाच्या कमाईवरती अवलंबून होते अशा लोकांचे मात्र हाल होत असल्याचे समोर आले. त्यामुळे या लोकांसाठी काहीतरी निर्णय घेण्याचे सरकारने ठरवले. त्यानंतर क्रेंद्र सरकारने पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजाना सुरू केली. ज्याअंतर्गत काही ठराविक काळामध्ये गरीब लोकांना फ्रीमध्ये रेशन पूरवले जाता होते.
त्यानंतर आता सरकारने पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेचा कालावधी वाढवला आहे. त्यामुळे आता गरिबांना मार्च 2022 पर्यंत मोफत रेशन मिळणार आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ही माहिती दिली आहे.
कोरोना संकटाच्या काळात मार्च 2020 मध्ये 'प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना' (PMGKAY) जाहीर करण्यात आली होती. ज्यामुळे ज्यांच्याकडे कमावण्याचे कोणतेही साधन नाही किंवा जे लोकं गरीब आहेत, त्यांना या योजनेचा फायदा होईल.
सुरुवातीला ही योजना एप्रिल-जून 2020 या कालावधीसाठी सुरू करण्यात आली होती, परंतु नंतर कोरानाचा वाढता प्रभाव पाहाता पुन्हा एकदा देशात लॉकडाऊन लावण्यात आला, ज्यानंतर ही तारीख पुन्हा एकदा वाढवून 30 नोव्हेंबरपर्यंत करण्यात आली.
परंतु आताची परिस्थिती पाहाता आणि या योजनेची गरज पाहाता क्रेंद्र सरकारने त्यात पुन्हा एकदा वाढ केली आहे. त्यामुळे आता गरीबांना पुन्हा एकदा या योजनेचा लाभ घेता येणार आहे.