Ration Card News : रेशनवर धान्य घेणाऱ्यांसाठी सरकारने महत्त्वाची बातमी दिली आहे. रेशन घेणार्‍या लोकांसाठी दुहेरी लाभ मिळणार आहे. सरकारकडून दिल्या जाणाऱ्या रेशनचा फायदा घेत असाल तर आता मे महिन्यात तुम्हाला दोनदा रेशन मिळणार आहे. केंद्र आणि राज्य शासनाकडून शिधापत्रिकाधारकांना अनेक प्रकारच्या सुविधा दिल्या जात आहेत. आता मे महिन्यात कार्डधारकांना दोन वेळा रेशन देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यामुळे गरीब कुटुंबांना खूप मदत होईल. याचा फायदा कोणला मिळणार आहे, ते जाणून घ्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता यापुढे रेशन दुकानावर या महिन्यात दोनवेळा धान्य मिळणार आहे. याबाबत हरियाणा राज्य सरकारने जारी केलेल्या सूचनेनुसार एप्रिल महिन्यात रेशनचा लाभ न मिळालेल्या सर्व लाभार्थ्यांना दुप्पट रेशन मिळणार आहे. त्याचबरोबर एप्रिल महिन्याचा रेशनचा साठाही रेशन डेपोत पोहोचला आहे. फक्त बीपीएल आणि एएवाय कार्डधारकांनाच याचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे याआधीच्या महिन्यात ज्यांना धान्य मिळाले नाही, त्यांनी ते धान्य मिळणार आहे.


 एप्रिल महिन्याचे रेशन 8 मे पर्यंत मिळेल..


हरियाणातील शिधापत्रिकाधारकांना एप्रिल महिन्याचे रेशन 8 मे पर्यंत मिळेल. अन्न आणि पुरवठा विभागाने आदेश जारी केल्यानंतर रेशन कार्ड ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. रेशन वितरणाची मुदत वाढवून देण्याची मागणी दुकानदारांनी केली होती. शिधावाटपाच्या दिरंगाईबाबत रेशन दुकानदाराकांनीकडून तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता विभागाने रेशन वितरणाची मुदत वाढवली आहे.


अन्न विभागाच्या अधिकार्‍यांशी चर्चा केली असता याबाबत अधिक माहिती देण्यात आली. ज्यांना रेशन न मिळाल्याने ग्राहकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. माहिती देताना दुकानदारांनी सांगितले की, अन्न पुरवठा विभागाकडून रेशन मिळत नसल्याने कार्डधारकांना वाटप करता येत नव्हते. गेल्या आठवड्यात अन्न व पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. यावेळी शिधावाटपाचा कालावधी वाढविण्याची मागणी केली होती. त्यानुसार ही मागणी मान्य करण्यात आली आहे. त्यामुळे मे महिन्यात एप्रिल महिन्याचे आणि आता मे महिन्याचे असे दोन वेळा धान्य मिळणार आहे.


शिधापत्रिकाधारकांना मोठा धक्का


तुम्ही रेशन कार्डधारक असाल तर आता तुम्हाला रेशनचा लाभ घेता येणार नाही. काही दिवसांपासून रेशनधान्य दुकानधरकांच्या मनमानीच्या बातम्या समोर येत आहेत. त्यानंतर सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. याप्रकरणी आता अन्न व पुरवठा विभाग कडक कारवाई करणार असल्याचे दिसून येत आहे. यासंदर्भात विभागाने नवा आदेश जारी केला आहे. या आदेशांचे पालन करावे लागेल, जे लोक सरकारी आदेशांचे पालन करणार नाहीत, त्यांना रेशनचा लाभ मिळणार नाही. सरकारी आदेशात म्हटले आहे की, कोणताही डेपो ऑपरेटर त्याच्या घरात धान्यदुकान चालवणार नाही. त्याचे घर जवळ असले तरी तो घरातून दुकान चावलतो. कुटुंबातील सदस्यांना नामनिर्देशित करुनच पीओएस चालविण्याचा अधिकार दिला जाऊ शकतो. मात्र, तो घरातून धान्य देऊ शकत नाही. यासोबतच कोणत्याही प्रकारची गडबड आढळून आल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असे सरकारने म्हटले आहे.