मुंबई : येस बँकेच्या ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी आहे. येस बँकेवरील निर्बंध उठवणार असल्याचे केंद्र सरकारने सांगितले आहे. १८ मार्चपासून येस बँकेवरील निर्बंध उठवण्यात येणार आहेत. केंद्र सरकारकडून ही माहिती देण्यात आली आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या येस बँकेवर रिझर्व्ह बँकेनं निर्बंध लादले असून ग्राहकांना त्यांच्या खात्यातील ५० हजारांपर्यंतचीच रक्कम काढता येत आहेत. तसेच शिक्षण, लग्नसमारंभ, वैद्यकीय खर्चासाठी अटींवर ५ लाख रुपये काढता येत आहेत. यापूर्वी येस बँकेच्या ग्राहकांना इंटरनेट बँकिंग, यूपीआय पेमेंट आणि एटीएममधून पैसे काढण्यासही समस्यांचा सामना करावा लागला होता. 


शुक्रवारी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या पार पडलेल्या बैठकीत सरकारने येस बँकेच्या पुनर्बांधणी योजनेला मंजुरी दिली आहे. दरम्यान खासगी क्षेत्रातील आयसीआयसीआय, एचडीएफसी बँक या दोन बँका येस बँकेत गुंतवणुकीसाठी पुढे सरसावल्या आहेत. दोन्ही बँकांनी प्रत्येकी १ हजार कोटी रूपये गुंतवणार असल्याची घोषणा केली आहे.