नवी दिल्ली: देशातल्या मालवाहतूकदारांनी आजपासून संप पुकारलाय. इंधनातली दरवाढ, टोल दर या कारणांमुळे संपाची हाक देण्यात आलीय. या संपात  देशातले ९० लाख ट्रकचालक सहभागी होणार आहेत. या संपातून अत्यावश्यक वाहतूक सेवा वगळण्यात येणार आहेत. गेल्या तीन महिन्यांमध्ये डिझेलच्या किंमतीमध्ये १७ रुपयांनी वाढ झाली आहे. थर्ड पार्टी विमा दरातल्या वाढीसह टोलचाही भार सोसावा लागत असल्यानं मालवाहतूकदार नाराज आहेत. त्यामुळे वाहतूकदारांच्या देशव्यापी संघटनेनं हा संप पुकारला आहे. जीवनावश्यक वस्तूंना यातून वगळण्यात आलं असलं तरी बंदरांच्या ठिकाणी या संपाचा फटका बसणार आहे.