१५ सेंकदाहून कमी वेळात व्याज न देता EMI वर मिळेल सामान
नव्या कंपन्या, ग्राहकांना बाय नाऊ पे लेटर (Buy now, Pay later)चा पर्याय
नवी दिल्ली : फेस्टिव्हल सिझनमध्ये (Festive Season) अनेक वस्तू तुम्हाला कमी दरात मिळाल्या. पण काही कारणामुळे तुम्हाला त्या घ्यायला मिळाल्या नसतील तर एक नामी संधी चालून आली आहे. घरगुती वस्तू विकत घेण्याचा विचार करत असाल तर अवघ्या १५ सेकंदात तुमचे लोन प्रोसेस होईल. जे तुम्ही नो कॉस्ट ईएमआय(No Cost EMI) वर चुकते करु शकता. ग्राहकांची वाढत्या मागणीनंतर अनेक नव्या कंपन्या, ग्राहकांना बाय नाऊ पे लेटर (Buy now, Pay later)चा पर्याय आहे.
M-Swipe ने लॉंच केली ऑफर
प्वाइंट ऑफ सेल कंपनी एम-स्वाइप ने १५ सेकंदाहून कमी वेळात शून्य व्याजात ईएमआय देण्याचा पर्याय दिलाय. यामुळे छोट्या व्यापाऱ्यांना आपले सामान विकण्यास मदत होणार आहे. यासाठी कंपनीने आपला नवा प्रोडक्ट Brand EMI लॉंच केला.
ग्राहकांना वेगवेगळ्या बॅंकच्या डेबिट आणि क्रेडीट कार्डवर ९५ टक्क्यांपर्यंत ब्रांड ईएमआयवर मिळणार आहे. वस्तू खरेदी केल्यानंतर पेमेंट करताना या कारणामुळे उशीर होतो. ग्राहकांचा हा वेळ वाचणार आहे.
ब्राण्ड इएमआयवर पर्याय असलेले मोबाईल, कंज्यूमर ड्यूरेबल्स एज्यूकेशन, हेल्थ, फर्नीचर, वेलनेस आणि लक्झरी सेगमेंटमध्ये खरेदी करणाऱ्यांना स्टोरअरमध्ये हे उपलब्ध होईल. यामुळे तुम्ही आपल्या आवडते सामान विना व्याजाचे आणि सुलभ हफ्त्यांवर खरेदी करु शकता.
भारतात अशा पद्धतीने डिजीटल पेमेंटमध्ये पर्याय देणारा M-Swipe हा एकमेव पर्याय आहे. यामध्ये UPI QR, NFC आधारित 'क्लिक आणि पे' आहे.
६.७५ लाख पीओएस आणि १.१ लाख क्यूआर व्यापाऱ्यांसोबत भारतात सर्वात मोठा पीओएस वापरकर्ता, एम स्वाईप आपली प्रीपेड मनीबॅंक देखील आणत आहे.