लो स्पीडमध्ये देखील उत्तम काम करणारं गुगलचं नवं अॅप!
आजकाल कोणतीही शंका असल्यास किंवा कशाही बद्दल माहिती हवी असल्यास आपण पटकन गुगलवर सर्च करतो. पण काही वेळा इंटरनेटच्या स्लो स्पीडमुळे सर्च करताना अडथळे येतात. पण काळजी करू नका. आता या समस्येचा तोडगा निघाला आहे. कंपनी गुगलचे लाईट व्हर्जन बाजारात लॉन्च करत आहे.
नवी दिल्ली : आजकाल कोणतीही शंका असल्यास किंवा कशाही बद्दल माहिती हवी असल्यास आपण पटकन गुगलवर सर्च करतो. पण काही वेळा इंटरनेटच्या स्लो स्पीडमुळे सर्च करताना अडथळे येतात. पण काळजी करू नका. आता या समस्येचा तोडगा निघाला आहे. कंपनी गुगलचे लाईट व्हर्जन बाजारात लॉन्च करत आहे.
लाईट व्हर्जनचे फीचर्स:
हे लाईट व्हर्जन अगदी गुगलच्या सर्चिंग अॅपप्रमाणे काम करेल. त्याचबरोबर टाईप करून किंवा बोलून तुम्ही त्यावर सर्च करू शकता. मीडियाच्या वृत्तानुसार आधीच्या अॅपच्या तुलनेत लाईट व्हर्जन कमी डाटा वापरेल. ( कंज्यूम करेल.) त्याचबरोबर लो बॅण्डविड्थवर देखील काम करू शकेल. सामान्य एनरॉईड फोनप्रमाणे फीचर फोनप्रमाणे त्यात देखील गुगलचे सगळे सर्च टूल असतील.
स्लो स्पीडमध्ये देखील उत्तम काम:
या अॅपद्वारे गुगल अशा लोकांना पर्यंत ही सेवा घेऊन जाणार आहे जिथे हाय स्पीड इंटरनेट सेवा अजूनही पोहचलेली नाही. याआधी गूगलने युट्यूबच्या लाईट व्हर्जनची टेस्ट केली आहे. त्यात देखील कमी स्पीडमध्ये सगळ्या सुविधा उपलब्ध होतील.