Google सर्चवर तुम्हाला ज्या विषयाची माहिती हवी आहे त्याबद्दलचे तपशील तुम्हाला सहज मिळू शकतात. मग तो देश असो, जग असो किंवा तुमचे शहर, तुम्हाला जी काही माहिती गोळा करायची आहे, ती काही सेकंदात मिळते. लोक गुगलला चमत्कारापेक्षा कमी मानत नाहीत. मात्र त्याचा वापर आपल्यासाठी समस्या देखील निर्माण करू शकतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

असे काही विषय आहेत ज्यांचा गुगलवर घेतलेला शोध तुम्हाला तुरुंगात टाकू शकतो. काही असे विषय आहेत ज्यासाठी भारत सरकारने कठोर नियम बनवले आहेत. या विषयांचा शोध घेण्याचा प्रयत्न केल्यास तुरुंगातही जावे लागू शकते. जाणून घेऊया अशा गुगलवर सर्चबाबत ज्यामुळे तुम्हाला तुरुंगात जावे लागू शकते.


दारूगोळा बनवण्याची पद्धत


जर तुम्ही बॉम्ब कसा बनवायचा याबद्दल गुगलवर गंमतीने काही सर्च केले तर त्यामुळे तुम्हाला तुरुंगात जावे लागू शकते. कारण देशात काम करणाऱ्या सुरक्षा यंत्रणा अशा सर्चवर लक्ष ठेवतात आणि जर कोणी गुगलवर या गोष्टी शोधल्या तर त्याच्यावर पोलीसांची कारवाई होऊ शकते. 


हॅकिंगबद्दल माहिती गोळा करणे
गुगल सर्चवर हॅकिंगशी संबंधित माहिती गोळा करण्याचा वारंवार प्रयत्न केल्यास अशा सर्चवर पोलिसांची नजर असते आणि आयटी सेल त्यावर कडक पावले उचलू शकतो. काही लोक हे आनंदाने करण्याचा विचार करतात, परंतु असे करणे त्यांच्यासाठी धोकादायक ठरु शकते.


बाल गुन्हेगारी


बालगुन्हेगारी (Child Crime) हा एक असा विषय आहे ज्याबद्दल सरकार नेहमीच अॅक्शन मोडमध्ये असते. जर तुम्ही यासंदर्भात कोणताही मजकूर शोधलात किंवा लहान मुलांचे व्हिडिओ पाहिले तर तुमच्यावर काही प्रकारची कारवाई होण्याची दाट शक्यता आहे. कारण हा अतिशय संवेदनशील मुद्दा आहे. त्यामुळे, याबद्दल काहीही शोधू नका.


अश्लील सामग्री


भारतात, अश्लील सामग्रीवर गुगल सर्चवर बंदी आहे. परंतु जर तुम्ही पुन्हा पुन्हा ते शोधण्याचा प्रयत्न केला तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते. त्यामुळे युजर्सने असे करू नये, यामुळे तुम्हाला पोलिस स्टेशनमध्ये जावे लागेल.