`एसपीजी`बाबत सरकारचे नवे नियम, परदेशातही सुरक्षा न्यावी लागणार
केंद्र सरकारने एसपीजी सुरक्षेबाबत नवे नियम केले आहेत.
नवी दिल्ली : केंद्र सरकारने एसपीजी सुरक्षेबाबत नवे नियम केले आहेत. या नव्या नियमांनुसार आता परदेश दौऱ्यावरही एसपीजी सुरक्षा नेत्यांसोबत राहिल. भारतामध्ये सध्या एसपीजी सुरक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशिवाय तिघांनाच मिळत आहे.
ज्यांना एसपीजी सुरक्षा देण्यात आली आहे, ते परदेशात जाताना पहिल्या पॉईंटपर्यंत सुरक्षा घ्यायचे, पण नंतर वैयक्तिक कारण सांगून एसपीजीला परत पाठवलं जायचं, त्यामुळे सरकारने हा निर्णय घेतला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींशिवाय सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वाड्रा यांना एसपीजी सुरक्षा मिळाली आहे. नव्या नियमांनुसार आता या सगळ्यांना परदेश दौऱ्यावर असताना आपल्यासोबत एसपीजी ठेवावी लागणार आहे.
ज्यांना एसपीजीची सुरक्षा मिळाली आहे ते देशाच्या बाहेर जरी असले तरी त्यांना एसपीजी सुरक्षा असेल. या नेत्यांना त्यांच्या परदेश दौऱ्याची माहितीदेखील सरकारला द्यावी लागेल.