नवी दिल्ली : विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सरकारने महागाईचा झटका दिला आहे. आता विमान प्रवास महागणार आहे. विभागाची माहिती ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांच्या नुसार नागरी उड्डाण मंत्रालयाने देशातील विमान प्रवासाचे टिकिट दर 9.83 ते 12.5 टक्क्यांनी वाढवले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशातील विमानसेवेची वाढती क्षमता
25 मे 2020 ला कोरोना विषाणूमुळे दोन महिने विमान सेवा बंद होती. त्यानंतर विमान सेवा पुन्हा सुरू करण्यात आल्या. आता परिस्थिती हळू हळू सामान्य होत आहे. सुरूवातीच्या दिवसांमध्ये कमी क्षमतेने विमान प्रवास सुरू होता. आता जास्त क्षमतेने विमाने उड्डाण घेत आहेत. 


12 ऑगस्ट रोजी मंत्रालयाने एका आदेशात म्हटले की, 40 मिनिटांच्या अवधीसाठी लोवर कॅप 11.53 टक्के वाढ म्हणजेच 2600 वरून 2900 करण्यात आले आहे. तसचे 40 मिनिटांपेक्षा कमी प्रवासासाठी अप्पर सीमा 12.82 टक्क्यांनी वाढली आहे. ही वाढ 3300 वरून 3700 इतकी करण्यात आली आहे.