नवी दिल्ली : चांगला गुंतवणूकदार मिळाल्यास सरकारनं एअर इंडियातून पूर्णपणे अंग काढून घ्यावे या मताशी सरकार अनुकूल असल्याचं अरूण जेटलींनी म्हटलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्र सरकारला तीन वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त ते दूरदर्शनला दिलेल्या मुलाखीतत बोलत होते. सध्या देशातील हवाई वाहतूक बाजारपेठेतील 84 टक्के कार्यभार खासगी विमान कंपन्या चालवतात. त्याच कंपन्या शंभर टक्के कार्यभाग का चालवू शकत नाहीत असा सवालही त्यांनी उपस्थीत केला.


सध्या एअर इंडियाचा बाजारपेठेतील हिस्सा अत्यंत कमी आहे. त्यातच कंपनीवर 50 कोटी रुपये कर्ज आहे. त्यामुळे सरकार ही कंपनी विकणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान जेटलींच्या संकेतानंतर एअर इंडियासह हवाई वाहतूक क्षेत्रात खळबळ उडालीये.