नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांतील केंद्र सरकारची कार्यपद्धती पाहता आता 'सीट डाऊन इंडिया', 'शटडाऊन इंडिया', 'शटअप इंडिया', यासारख्या नावांनी सरकारी योजना सुरु करायला पाहिजेत, अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी केली. ते मंगळवारी लोकसभेत बोलत होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी शशी थरूर यांनी स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामरावर हवाई कंपन्यांनी घातलेल्या बंदीचा उल्लेख करत सरकारला टोला लगावला. केंद्र सरकारने आतापर्यंत स्किल इंडिया, डिजिटल इंडिया आणि स्टार्टअप इंडिया यासारख्या योजनांच्या केवळ बाताच मारल्या. मात्र, स्टॅडअप कॉमेडियनवर बंदी घालणाऱ्या स्टॅडअप इंडिया योजनेचा केंद्र सरकारने अजून उल्लेख केलेला नाही. मात्र, यापुढे सरकारी योजनांची नावे 'सीट डाऊन इंडिया', 'शटडाऊन इंडिया', 'शटअप इंडिया', अशीच ठेवला पाहिजेत, अशी टीका थरूर यांनी केली. 


जामिया आणि शाहीन बागेतील आंदोलनामागे राजकीय डिझाईन- मोदी



काही दिवसांपूर्वी इंडिगो एअरलाईन्सच्या विमानात कुणाल कामराने पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्याशी आक्षेपार्ह वर्तन केले होते. त्यामुळे इंडिगो एअरलाईन्स, एअर इंडिया, स्पाईस जेट या विमान कंपन्यांनी कुणाल कामरावर बंदी घातली होती. यावेळी केंद्रीय उड्डाण मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी ट्विट करून हवाई कंपन्यांना कुणाल कामरावर बंदी घालण्याचा सल्ला दिला होता. यावरून बराच वादंग निर्माण झाला आहे.