जयपूर : सरकारी शाळेवरचा विश्वास उडेल अशी घटना राजस्थानच्या झुंझुनू जिल्ह्यात घडला आहे. ज्या देशात शिक्षकाला गुरूच्या स्थानी ठेवलं जातं अशा देशात अशा घटना घडणं ही अतिशय धक्कादायक बाब आहे. सरकारी शाळेत 12 विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्र सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या या सरकारी शाळेत तब्बल 12 विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. झुंझुनूं पोलिसांनी या शिक्षकाला अटक केली आहे. त्यानंतर न्यायालयात दाखल देखील करण्यात आलं. न्यायालयाने शिक्षकाला दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. 


आठ डिसेंबर रोजी शाळेतील समितीकडून शिक्षकाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. आठ विद्यार्थ्यांचा लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी शिक्षकाला अटक करण्यात आली. पोलीस तपासात समोर आलं की, आठ नाही तर तब्बल 12 विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार करण्यात आला आहे. 



7डिसेंबर रोजी समोर आली घटना 


शाळेतील इतर शिक्षक विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी एका विद्यार्थ्याने हिम्म्त करून 'त्या' शिक्षकाच्या दुष्कर्माची माहिती दिली. यानंतर चौकशी करण्यात आली. त्या चौकशीत जवळपास सात, आठ मुलं समोर आली. 



विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शाळेत तक्रारपेटी आहे. या तक्रारपेटीत या विद्यार्थ्यांनी दुष्कर्म करणाऱ्या शिक्षकाची तक्रार केली होती. मात्र फेरबदल करून तो शिक्षक तक्रारीचा कागद काढून टाकत होता. हे देखील विद्यार्थ्यांनी सांगितलं आहे. शाळेच्या मुख्याध्यापकांनी पोलीस तक्रार केली. यामध्ये 10 विद्यार्थी हे राजस्थानचे एक विद्यार्थी यूपीचा आणि एक विद्यार्थी दिल्लीचा राहणारा आहे. या विद्यार्थ्यांची मेडिकल तपासणी देखील करण्यात आली आहे. या प्रकरणानंतर सरकारी शाळेतही विद्यार्थी सुरक्षित नसल्याचं समोर आलं आहे.