JanDhan Yojana: तुम्हीही जनधन खातं (Jandhan Account) उघडले असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. जनधन खातेधारकांना (Jandhan Account holders) दरमहा 3 हजार रुपये मिळणार आहेत. तुम्ही देखील हे सरकारी खाते उघडले असेल तर जाणून घ्या 3000 रुपयांचा फायदा कसा घ्यायचा. (government will give to 3 thousand ruppes per month to jandhan accountholder pension as per scheme)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी जनधन खातं असणं आवश्यक आहे. याच खात्यात खातेदारांना सरकारी योजनेचा लाभ मिळतो. कोणत्याही योजनेंतर्गत थेट लोकांच्या खात्यात पैसे जमा केले जातात. त्या सर्व योजनांची रक्कम ही जनधन खात्यात ट्रान्सफर केली जाते. 


पेन्शन स्वरुपात मिळते रक्कम


तुम्हाला अशा एका सरकारी योजनेबद्दल सांगणार आहोत, ज्या अंतर्गत तुम्हाला वार्षिक 36 हजार रुपये मिळतात. या सरकारी योजनेचे नाव प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना आहे. या योजनेंतर्गत मिळणारी रक्कम सरकार पेन्शन स्वरूपात देते. 


योजनेबद्दल सविस्तर


18 ते 40 वयोगटातील कोणीही नागरिक सहभागी होऊ शकतो. या योजनेची रक्कम ही वयाच्या 60 व्या वर्षी  मिळते. त्यानुसार वर्षाला खात्यात 36 हजार रुपये ट्रान्सफर केले जातात.  असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्यांना 'या' योजनेचा लाभ मिळतो. मासिक उत्पन्न 15 हजारांपेक्षा कमी असेल तरच तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता. फेरीवाले, मध्यान्ह भोजन कामगार, हेड लोडर, वीटभट्टी कामगार, मोची, चिंध्या वेचणारे, घरगुती कामगार, धोबी, रिक्षाचालक, भूमिहीन मजूर या योजनेचा लाभ घेऊ शकतात. 


या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड असणं आवश्यक आहे. याशिवाय जनधन खाते आवश्यक आहे. सोबतच बचत खात्याचे तपशील देखील सबमिट करावे लागतील. 


योजनेचा हफ्ता किती?  


या योजनेंतर्गत विविध वयोगटानुसार दरमहा 55 ते 200 रुपये भरावे लागतील. जर वयाच्या 18व्या वर्षी या योजनेत गुंतवणूक केली तर दर महिन्याला 55 रुपये द्यावे लागतील. 30 वर्षांच्या लोकांना 100 रुपये आणि 40 वर्षांच्या लोकांना 200 रुपये भरावे लागतील. या योजनेत नोंदणी करण्यासाठी बँक खात्याचा किंवा जन धन खात्याचा IFS कोड आवश्यक असेल. याशिवाय तुमच्याकडे आधार कार्ड आणि मोबाईल नंबर असणं आवश्यक आहे.