बेगूसराय, बिहार : सरकारी रुग्णालय म्हटलं की आपल्या मनात अव्यवस्था, संसाधनांचा अभाव, डॉक्टरांची अनास्था असं चित्र उभं राहतं. त्यामुळे रुग्णाला अशा रुग्णालयात घेऊन जाणं सहसा टाळलं जातं. परंतु बिहारच्या बेगूसरायमधील सरकारी 'सदर रुग्णालय' याला अपवाद म्हणावं लागेल. सर्व सोयी-सुविधांसाठी 'सदर रूग्णालया'ने बिहारमध्ये पहिल्या क्रमांक पटकावलाय. वर्ष २०१८ मद्ये केंद्र सरकारकडून 'सदर रुग्णालया'ला 'कायकल्प' पुरस्कार देण्यात आला होता. पुरस्कार रूपात रुग्णालयाला २० लाख रूपये मदतनिधीही मिळाला होता. नियमांनुसार, पुरस्कार म्हणून मिळालेल्या रक्कमेचा एक चतुर्थांश भाग रुग्णालायाच्या कर्मचाऱ्यांमध्ये वाटण्यात येतो. परंतु अनेक अधिकाऱ्यांनी पैसे न घेता ते पैसे रुग्णालयाच्या विकास कामांसाठी दिले होते. 


'सदर रुग्णालय'

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बेगूसरायमधील सदर रुग्णालयाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सामान्य जनतेकडून या रुग्णालयाची मोठी प्रशंसा केली जात आहे. रुग्णालयाच्या या स्थितीचे संपूर्ण श्रेय रुग्णालयाचे अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना जात असल्याची प्रतिक्रिया रुग्णालयाच्या 'डीएम'नी दिलीय. रुग्णालयाचा दर्जा सुधारावा यासाठी डॉक्टरांच्या उपलब्धतेपासून ते संपूर्ण व्यवस्थेमध्ये सुधारणा करण्याचे अनेक प्रयत्न केले असल्याचे त्यांनी सांगितले. 


 



रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना तसेच त्यांच्या नातेवाईकांना रूग्णालय परिसरात स्वच्छता ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच कचराकुंडीची व्यवस्थाही करण्यात आली आहे. जिल्ह्यात जवळपास ३५ सरकारी रुग्णवाहिका आहेत. जिल्ह्यातील सर्वच सरकारी रुग्णालयांची स्थिती सुधारण्याचा मानस असल्याचे जिल्हाधिकारांनी सांगितले.


'सदर रुग्णालय'

१९७२ साली 'सदर रुग्णालय' पहिल्यांदा जनतेच्या सेवेसाठी खुलं करण्यात आलं होतं. परंतु रुग्णालयाची स्थिती अतिशय भयावह होती. त्यानंतर रुग्णालयात अनेक सुधारणा करण्यात आल्या. आता हे रुग्णालय बिहारमधील सर्वोत्तम सुविधा असलेले सरकारी रुग्णालय ठरले आहे.