`काश्मीरचे राज्यपाल सतत दारू पितात`, गोव्याच्या राज्यपालांचे वादग्रस्त विधान
गोव्याचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी वादग्रस्त वक्तव्य केलंय.
गोवा : गोव्याचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी वादग्रस्त वक्तव्य केलंय. बागपतमध्ये भाषण करताना त्यांनी एकूणच राज्यपालांना काही काम नसतं. काश्मीरचे राज्यपाल सतत दारू पितात आणि गोल्फ खेळतात असं म्हटंलंय. इतर ठिकाणचे राज्यपाल आरामात राहतात, कोणत्याही भांडणात पडत नाहीत असं मलिक म्हणालेत. यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटले आहे.