नवी दिल्ली : अर्थसंकल्पात सरकारने मोठा निर्णय घेतला असून यामुळे पेट्रोल-डिझेल स्वस्त झाले आहे. 


पेट्रोल-डिझेलचे दराच्या कपात


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सरकारने पेट्रोल-डिझेलवरील एक्साईज ड्यूटी घटवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पेट्रोल डिझेलच्या किंमतीत २ रूपयांनी कपात झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड तेलाचे भाव वाढल्याने आणि भारतीय रूपयात आलेल्या घसरणीमुळे पेट्रोल-डिझेलचे भाव वाढत आहेत. आयओसीच्य वेबसाईटवर मिळालेल्या आकडेवारीनुसार, दिल्लीत गेल्या महिन्यात म्हणजेच जानीवारीत पेट्रोलचे दर २.९५ रूपये इतके वाढले आहे. 


एक्साईज ड्यूटीमध्ये कपात


सरकारने पेट्रोलवरील एक्साईज ड्युटी २ रूपयांनी घटवून ४.४८ रूपये प्रति लिटर केली आहे. तेच डिझेलवरील एक्साईज ड्युटी २ रूपयांनी घटवून ६.३३ रूपये प्रति लिटर केली आहे. 


या आधारावर ठरतात पेट्रोल-डिझेलचे दर


तेल बाजारात कंपन्या तीन आधारांवर पेट्रोल-डिझेलचे दर निश्चित करतात. पहिले आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड(कच्च्या तेलाचे भाव), दुसरा देशात इम्पोर्ट करताना भारतीय रूपयाची डॉलरच्या तुलनेत किंमत, त्यानंतर तिसरे म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोल-डिझेलचे काय दर आहेत.