मुंबई : आजकाल प्रत्येक लोकांना आपल्या भविष्याची काळजी लागलेली असते. आमच्या उतार वयात काहीतरी रक्कम आमच्याकडे असावी, जेणे करुन आमचं म्हातारपण सुखात जाईल. प्रत्येकाला वाटत असते की, उद्या मला पैशांची गरज भासली तर, मला कोण मदत करेल? मग मला कोणावर तरी अवलंबून रहावं लागेल. म्हणून मग लोकं आता दर महिन्याला एक ठराविक रक्कम जमा करतात आणि एखाद्या पेन्शन स्किममध्ये टाकतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरंतर मागच्या एका वर्षापासून लोकांमध्ये पेन्शन स्किममध्ये पैसे गुंतवणूक करण्यासाठी जागरुकता वाढली आहे. आणि याचा पुरावा द्यायचा झाला तर, मागच्या एका वर्षापासून राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS) आणि अटल पेन्शन योजना (APY) मधील वाढत जाणारी खातेधारकांची संख्या आहे. फेब्रुवारी 2021च्या शेवटपर्यंत राष्ट्रीय पेन्शन आणि अटल पेन्शन योजनाच्या खातेधारकांची ही संख्या 22% ने वाढून 4.15 कोटी झाली आहे.


पेन्शन क्षेत्रच्या अंतर्गत पेन्शन फंड रेग्युलेटरी ऍड डेव्हलपमेंट अथोरिटी (PFRDA) ने सांगितले की, वेगवेगळ्या योजनेअंतर्गत खाते धारकांची संख्या फेब्रुवारी 2020 पर्यंत 3.40 कोटी होती, जी आता फेब्रुवारी 2021 पर्यंतर वाढून 4.15 कोटी झाली आहे. 


खरंतर मागच्यावर्षी लॅाकडाऊनमुळे लोकांचा पगार कपात झाला होता. तरीही लोकांनी त्यांच्या भविष्याचा विचार करुन, या योजनेत पैसे गुंतवले आहेत. तुम्ही जर अजून ही या योजनांमध्ये पैसे गुंतवले नसतील तर, लवकरच याची माहिती घेऊन सुरु करा. कारण यामध्ये प्रत्येकाच्या पगारानुसार वेगवेगळ्या स्किम आहेत.


भारत सरकारची ही योजना तुम्हाला पेन्शनची गॅरेंन्टी देते. जर तुमचं वय 18 ते 40 वर्षापर्यंतर असेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. 60 वर्षापर्यंत दर महिन्याला एक ठराविक रक्कम भरावी लागेल.  तुमचे वय 60 वर्ष होताच प्रत्येक महिना तुम्हाला एक ठराविक रक्कम मिळेल.