केंद्र सरकारकडून वार्षिक उत्पन्नासंदर्भातील मोठी आकडेवारी जाहीर; पाहा यामध्ये तुम्हीही येता का
Salary News : संसदेत सध्या सुरु असणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडले जात असून, याचदरम्यान देशातील नागरिकांच्या वेतनासंदर्भातील महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
Annual Income News : नोकरदार (job) वर्गासाठी दरवर्षी होणारी पगारवाढ अतिशय महत्त्वाची असून ही पगारवाढ (Salary Hike) गेल्या काही वर्षांमध्ये नोकरदार वर्गाची आणि बहुविध मार्गांनी कमाई करणाऱ्यांची खऱ्या अर्थानं भरभराट करून गेली आहे असं म्हणणं गैर ठरणार नाही. संसदेत केंद्रीय अर्थमंत्रालयाकडून सादर करण्यात आलेल्या आकडेवारीवरून हेच स्पष्ट होत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे भारतात श्रीमंतांचा आकडा (Indian Rich People) वाढत असून, मागील आर्थिक वर्षामधील आयकर फायलिंगमुळं हीच बबा स्पष्ट होत आहे.
केंद्राकडून संसदेत सादर करण्यात आलेल्या माहितीनुसार देशभरात सध्या 1 कोटी रुपयांहून अधिक कमाई करणाऱ्यांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ज्यामुळं 31 डिसेंबर 2023 पर्यंत देशातील कोट्यधीशांची संख्या 2.16 लाख रुपयांपर्यंत पोहोचला आहे. या कमाईचे आकडे पाहता सुस्थितीत असणारी आणि समाधानकारक वेतन देणारी नोकरी, व्यवसाय क्षेत्रातील प्रगती असे अनेक घटक अधोरेखित होत आहेत. तुम्हीही या आकडेवारीचाच एक भाग आहात ही बाबसुद्धा इथं नाकारता येत नाही.
हेसुद्धा वाचा : HDFC Bank चा मोठा झटका; अचानक व्याजदरात वाढ केल्यामुळं अनेकांचा खिसा रिकामा?
केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत देशाच्या वार्षित उत्पन्नातील वाढीला आकडा जाहीर केला. यासोबत त्यांनी आपल्या अर्थार्जनाची संपूर्ण माहिती केंद्राला देणाऱ्यांचा आकडाही त्यांनी जाहीर केला. देशातील नागरिकांची अर्थार्जनाची क्षमता वाढणं आणि श्रीमंतांचा एकूण आकडा वाढणं ही बाब देशाच्या विकासदर वाढीकडे (India Growth Rate) खुणावत आहे. महत्त्वाचं म्हणजे ही क्रिया सातत्यानं सुरु राहिल्यास देशातील श्रीमंतांचा आकडा येणाऱ्या दर वर्षागणिक वाढता राहणार आहे हे या आकडेवारीतून स्पष्ट झालं.
देशातील कोट्यधीशांचा आकडा
असेसमेंट इयर 2023-24 मध्ये आयकरासंबंधीची सविस्तर माहिती देणाऱ्यांची एकूण संख्या 7.41 कोटी इतकी होती. राज्यमंत्र्यांच्या माहितीनुसार आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये 1 कोटी आणि त्याहून अधिक उत्पन्न आसणाऱ्यांचा आकडा 1,87,000 इतका होता. पण, मून्यांकन वर्ष अर्थात असेसमेंट इयर 2023-24 मध्ये 1 कोटी आणि त्याहून अधिक उत्पन्न असणाऱ्यांचा आकडा मोठ्या फरकानं वाढून 2,16,000 वर पोहोचला आहे. कोट्यवधींची कमाई करणाऱ्यांचा आकडा वाढत असल्याचं सांगताना राज्यमंत्र्यांनी त्यांच्याकडून भरण्यात आलेल्या आयकराची आकडेवारीसुद्धा जाहीर केली.