Trending Video : आजोबा आजी जोमात, पाहणारा कोमात; हा Video तुम्ही पाहिला का?
Viral Video : या व्हिडीओमधील आजोबांनी समाजाची काळजी न करता आजीबद्दलचं प्रेम व्यक्त केलं...पण अहो हे करत असताना ते कॅमेऱ्यात कैद झाले. हा मजेदार व्हिडीओ (funny video) सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
Grandparents romantic Video : ज्येष्ठ कवी दिवंगत मंगेश पाडगावकर म्हणायचे प्रेम (love) म्हणजे प्रेम असतं आणि तुमचं आमचं सेम असतं. हो, प्रेम कधी कुठे कोणासोबत होईल यांचं काही नेम नाही. तसंच प्रेमाच्या भावना व्यक्त करण्यासाठी वयाची मर्यादा नसते. प्रेम बॉलिवूडमधील (Bollywood) कलाकारांचे असो किंवा सर्वसामान्यांचे प्रेम हे प्रेम असतं. ती एक खूप सुंदर भावना आहे. सोशल मीडियावर आपण दररोज अनेक व्हिडीओ पाहतो ज्यात कपल आपल्या प्रेमाच्या भावना व्यक्त करतात. तर या सोशल मीडियावर आजी-आजोबांचेही (grandparents) अनेक रोमँटिक व्हिडीओ (Romantic video) आपल्याला पाहिला मिळतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Video viral on social media) होतो आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी कोमात जातात आहे.
आजोबांवर चढलं प्रेमाचं भूत!
आयुष्य हे खूप सुंदर आहे आणि ते आपल्यामधील प्रेमाने अजून सुंदर होतं. प्रेमाचे रंग वेगवेगळे असतात ते कधी शब्दांनी तर कधी स्पर्शांनी तर कधी छोट्या छोट्या गोष्टीतून एकमेकांना सांगितले जातात. म्हणतात उतारवयात (old couple) खरी प्रेमाची परिभाषा कळते. त्यावेळी आपल्याला आपल्या जोडीदाराची खास गरज असते. उतारवयातील प्रेम हे खऱ्या अर्थाने निस्वार्थ, सुंदर आणि परीपूर्ण असतं. या व्हिडीओमधील आजोबांनी समाजाची काळजी न करता आजीबद्दलचं प्रेम व्यक्त केलं...पण अहो हे करत असताना ते कॅमेऱ्यात कैद झाले. हा मजेदार व्हिडीओ (funny video) सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. (Grandfather Grandmother Love Romance Video viral on Social media nmp)
आजोबा आजी जोमात, पाहणारा कोमात
या व्हिडीओमध्ये आजी-आजोबा एका ऑटो-रिक्षातून प्रवास करत आहेत. आजीला झोप येतं आहे म्हणून ती आजोबांच्या खांद्यावर मान ठेवते आणि काय आजोबांनी आजीला किस केली...हो आजोबांना प्रेमाचं भूत चढलं वाटतं. इतर वेळी आपण प्रेमी युगुलांना ही Public Place अशी आठवण करुन देतो. पण या आजोबांनी तर कसला ही विचार न करता आजीला किस केली. मजेशीर म्हणजे यानंतर आजीने जी प्रतिक्रिया दिली आहे ती भन्नाट आहे. तुम्हाला जाणून घ्यायचं आहे काय प्रतिक्रिया होती आजीबाईची मग बघा हा व्हिडीओ
मजेदार व्हिडीओ
बघितलं...सध्या सोशल मीडियावर या आजोबांची जोरदार चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ दररोज व्हायरल होतं असतात. त्यातील हा व्हिडीओ मात्र सगळ्यांचं लक्ष वेधून घेतं आहे. आयुष्यात अनेक संकट आहेत, अडचणी आहेत, पण एकमेकांविषयी प्रेम आणि आदर असेल तर आयुष्य सोपं होतं. व्हिडीओमधील आजीआजोबांमधील प्रेम हे निस्वार्थ आणि सुंदर आहे. हे आजी-आजोबा प्रत्येक क्षण जगण्याचा आनंद घेतं आहे आणि आयुष्य जगत आहेत.