Speak Fluent English On Mahatma Gandhi: भारतात अनेक भाषा बोलल्या जातात. भारतीय आपली मातृभाषा सहजतेने बोलतात. मात्र अनेकांना इंग्रजी बोलताना (English Speaking), वाचताना आणि ऐकताना एक वेगळाच न्यूनगंड  येतो. त्यामुळे इंग्रजीपासून काही जण दोन हात लांब राहणं पसंत करतात. पण इंग्रजी ही केवळ भाषा असून रोजच्या सरावातून सहज बोलता येते. एका आजींनी हे सिद्ध करून दाखवलं आहे. आजीचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Viral Video) वेगाने व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओत आजी एकदम फर्राटेदार इंग्रजी बोलताना दिसत आहे. महात्मा गांधींची माहिती आजी भराभर सांगताना दिसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पेहरावानुसार आजी राजस्थानमधील आहे, असं सांगण्यात येत आहे. बोलण्याचा सूर देखील राजस्थानी आहे. यावेळी आजींना इंग्रजीत महात्मा गांधींवर निबंध सांगायचा आहे, असं सांगताच भराभर शब्द बाहेर येऊ लागले. याबरोबरच हिंदीतील शब्द आणि नंबरही बोलत होती. पण आजीचा आत्मविश्वास वाखाण्याजोगा होता आणि इंग्रजी बोलतच सुटली. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


बाइक चोरी करण्यास चोराला आलं अपयश, असा काढला राग Video Viral


आजीचा हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वेगाने व्हायरल होत आहे. latayogesh79 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. गेल्या दहा दिवसात 1 लाखाहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडीओ शेअर करत आहेत. नेटकरी व्हिडीओखाली आपल्या मजेशीर प्रतिक्रिया देखील नोंदवत आहेत.