नवी दिल्ली : नोकरी करणाऱ्या प्रत्येकासाठी आनंदाची बातमी आहे. जे सरकारी किंवा खाजगी कंपनीमध्ये नोकरी करतात त्यांच्या ग्रॅच्युटींच्या नोकरीबाबत सरकार मोठा निर्णय घेण्याचा विचार करते आहे. यानुसार आता वेळेची सीमा कमी करण्याचा आणि टॅक्‍स फ्री ग्रॅच्‍युटीची रक्कम दुप्पट करण्याचा सरकार विचार करत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कामगार मंत्रालयाद्वारे तयार केलेल्या नव्या प्रस्तावानुसार जर सरकार सहमती दर्शवते तर एक वर्षानतर नोकरी सोडणाऱ्या व्यक्तीला देखील ग्रॅच्युटीचा अधिकार मिळेल. आता ५ वर्ष नोकरी करणाऱ्यांनाच ग्रॅच्युटी मिळते. कामगार मंत्रालयांच्या सूत्रानुसार या संबंधित प्रस्ताव दूसऱ्या मंत्रालयांना विचार करण्यासाठी पाठवण्यात आला आहे.


मंत्रालयाकडून लवकरच हिरवा झेंडा मिळण्याची शक्यता आहे. पेमेंट ऑफ ग्रॅच्युटी अॅक्‍टमध्ये देखील लवकरच बदल होईल. भारतीय कामगार संघाचे महासचिव विरेश उपाध्याय यांनी म्हटलं आहे की, आम्ही कर्मचाऱ्यांच्या हितामध्ये प्रस्तावाचं समर्थन करु. याआधी सरकारने शिफारश केली होती की, प्रायवेट सेक्टरमध्ये काम करणाऱ्या कर्मताऱ्यांना देखील केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे २० लाख रुपये ग्रॅच्युटी मिळावी. कॅबिनेटकडून प्रस्ताव पास झाल्यानंतर संसदेत ते विधेयक मांडलं जाणार आहे.


कामगार मंत्री बंडारू दत्तात्रेय यांच्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. प्रायवेट सेक्टरमध्ये ग्रॅच्युटीची सीमा १० लाखांहून २० लाख करण्याचा प्रस्ताव होता. सातवा वेतन आयोगाने देखील ग्रॅच्युटीची सीमा १० लाखाहून २० लाख करण्याची शिफारस केली होती. केंद्र सरकार आणि काही राज्य सरकारने देखील हा निर्णय घेतला आहे.


केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे की, प्रायवेट सेक्टरमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील ग्रॅच्युटीची रक्कम दुप्पट मिळावी. सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे खाजगी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील समान रक्कम मिळणार आहे.