Lift Viral Video : लिफ्टमध्ये अडकला 8 वर्षाचा मुलगा, 10 मिनिट झाली तरी कोणीही...पाहा VIDEO
Greater Noida Lift Viral Video : ग्रेटर नोएडाच्या (Greater Noida) निराला अस्पायर सोसायटीच्या (Nirala Aspire society) लिफ्टमध्ये अडकलेल्या मुलाचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. शुक्रवारी तळमजल्यावरून 14व्या मजल्यावर जाताना हा मुलगा चौथ्या आणि पाचव्या मजल्यावर तब्बल 10 मिनिटे अडकला होता.
Greater Noida Lift Viral Video : सोशल मीडियावर दररोज लिफ्टमध्ये नागरीक अडकल्याच्या घटना समोर येत असतात. अशीच एक घटना समोर आली आहे. या घटनेत एक 8 वर्षाचा चिमुकला लिफ्टमध्ये (Lift Viral Video) अडकल्याची घटना घडलीय. तब्बल 10 मिनिटे हा मुलगा लिफ्टमध्ये अडकला होता आणि बचावासाठी खुप प्रयत्न करत होता. मात्र कोणीही त्याच्या बचावासाठी आले नव्हते. हा व्हिडिओ पाहून तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल.
कुठे घटना घडली?
ग्रेटर नोएडाच्या (Greater Noida) निराला अस्पायर सोसायटीच्या (Nirala Aspire society) लिफ्टमध्ये अडकलेल्या मुलाचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. शुक्रवारी तळमजल्यावरून 14व्या मजल्यावर जाताना हा मुलगा चौथ्या आणि पाचव्या मजल्यावर तब्बल 10 मिनिटे अडकला होता. त्याने इमर्जन्सी बटण दाबून देखील त्याला मदत मिळाली नव्हती. ही संपूर्ण घटना लिफ्टमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
हे ही वाचा : वृध्द व्यक्तीचा भरधाव रस्त्यावर भन्नाट स्टंट,पाहा VIDEO
व्हिडिओत काय?
सीसीटीव्हीत तुम्ही पाहू शकता एक 8 वर्षाचा मुलगा सायकलसोबत लिफ्टमध्ये अडकला आहे. ही लिफ्ट सुरु होताच मध्येच अडकते. त्यामुळे चिमुकला पुरता गोंधळून जातो. मदतीसाठी आरडाओरडा करतो, लिफ्टच्या दरवाजावर ठोकतो. मुलगा लिफ्टमध्ये बसवण्यात आलेले इंटरकॉम आणि इमर्जन्सी बटणाचाही वापर करतो. मात्र मॉनिटरिंग रूममधील सीसीटीव्ही फुटेज पाहणाऱ्या गार्डने लक्ष दिले नाही. तब्बल 10 मिनिटे बचावासाठी तो प्रयत्न करतोय. या घटनेचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे.
असा सुखरूप बचावला
लिफ्टमधील (Lift Viral Video) चिमुकल्याच्या आवाज ऐकून पाचव्या मजल्यावर राहणाऱ्या एका रहिवाशाने मदतीसाठी धाव घेतली. त्यांनी देखभाल करणाऱ्या कर्मचाऱ्यांना गार्ड रूममध्ये बोलावले आणि त्यानंतर मुलाला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.
अशा घटना याआधी देखील सोसायटीत (Lift Viral Video) घडल्या आहेत. त्यामुळे चिमुकल्याच्या कुटूंबियांनी आता आरडब्लूचे अध्यक्ष आणि सेक्रेटरी, मेन्टेनन्स कंपनीसह क्रॉसिंग पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.