उत्तर प्रदेश : लग्न म्हटलं तर आलिशान तयारी आलीचं, सर्वांचीच लगबग, जो तो लग्नात एक एक काम निपटायच्या तयारीत, नवरी लग्नाचा जोडा घालून तयार, अशी सर्व तयारी झाली. नवऱ्याची वरात नवरीच्या दारातही आली, तुफान नाचली देखील. मात्र लग्नात या एक गोष्टीची कमी आढळल्याने नवरीविनाच वरात परतल्याची घटना घडलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तर प्रदेश राज्याच्या संभल जिल्ह्यातील एका गावात लग्नाची धामधूम सुरू होती. लग्नाच्या घरात तर मोठी लगबग सुरू होती. नवऱ्याच्या स्वागतासाठी नवरीकडचे नाश्ता-जेवणापासून, आरामापर्यंत अशी सर्वंच तयारी करत होते. अखेर वरात दारात आली आणि बॅजोच्या तालावर तुफान नाचली. या वरातीचे नवरीकडच्यांनी जोरदार स्वागतही झाले.  


रसमलाईचा धरला हट्ट 
वरातीतल्या नवऱ्याच्या काही मित्र आणि नातेवाईकांनी दारूचे सेवन केले होते. त्यामुळे हे दारूडे सतत नवरीकडच्यांकडे रसमलाई देण्याचा हट्ट करत होते. नवऱ्याकडच्यांना समजवून सुद्धा ते हट्टावर कायम होते. त्यामुळे या रसमलाईचा वाद इतका वाढला की थेट लग्न मोडण्यावरचं बात गेली. नवऱ्याकडच्यांनी त्या एका क्षुल्लक कारणावरून थेट लग्न मोडत वरात नवरीविनाच परतली. ही घटना बुधवार 15 जून रोजी घडली होती. 


पोलिस ठाण्यात तक्रार
या घटनेने नवरीच्या कुटुंबीयांच्या आनंदावर विरजण पडले. या घटनेला वैतागून नवरीच्या कुटुंबीयांनी चार जणांविरुद्ध पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केला. या तक्रारीनंतर दुसऱ्याच दिवशी 16 जून रोजी नवरा आणि नवरीच्या नातवाईंकांची आपापसात बोलणी झाली. आणि नंतर दोघांनी नातेवाईकांच्या साक्षीने लगीनगाठ बाधली. अशाप्रकारे अपुर्ण लग्न पुर्ण झाले.