पलसा : पावसामुळे उत्तर बिहारमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सर्व नद्यांना पूर आला आहे. तसेच गावकडेचे बहूतेक रस्ते हे नद्या किंवा ओढ्यामार्फत एकमेकांशी जोडलेले असतात. म्हणजे बहुतेकदा लोकं नद्या आणि ओढ्यांमार्फत प्रवास करतात. त्यामुळे जर नद्यांना पूर आला, तर लोकांना प्रवास करणे फार कठीण होते किंवा काही वेळा लोकांना नद्यांना पूर आल्यामुळे स्थलांतर देखील करावा लागतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशा पूर परिस्थितीमध्ये एक नवीन लग्न झालेले जोडपे अडकले होते. ज्यामुळे नवऱ्याला त्याच्या नव वधूला घरी घेऊन जाताना या परिस्थितीला तोंड द्यावे लागले. वधू-वरांच्या या अडचणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.


किशनगंजमधील कणकई नदीच्या पलसा घाटातील हा एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक वर आपल्या नववधूला खांद्यावर घेऊन नदी पार करत आहे.



नवऱ्याची वरात लोहागढ गावातून पलसा गावात गेली होती. परत येत असताना नदीतील पाणी खूप वाढले होते. त्यामुळे मग बोटीतून उतरुन नदीतून चालत जाणे वधूला शक्य नव्हते, म्हणून मग वराने वधूला उचलून घेतले आणि तो चालू लागला.


हा व्हिडीओ लोकांनी केवळ एकमेकांसोबतच शेअरच नाही केला, तर त्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रियाही लोकांकडून येत आहेत. हा व्हिडिओ आजकाल मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.