मुंडावळ्या बांधत असताना नवरदेव खाली कोसळला, हसते-खेळते कुटुंब एका क्षणात उद्ध्वस्त
Groom Dies Of Heart Attack : लग्नाची तयारी सुरू असतानाच नवरदेवाला हृदयविकाराचा झटका आला. काही वेळातच त्याने प्राण सोडले
Groom Died On Wedding Day: उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) बहराइच जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लग्नाचा (Wedding) मांडव सजला होता. नववधू आतुरतेने भावी पतीची वाट पाहत होती. नवरदेवही उत्साहात तयार होत होता. वरपक्ष बारात घेऊन निघणार इतक्यात नवरदेवाला हृदयविकाराचा (Heart Attack) झटका आला. मुलगा खाली कोसळताच कुटुंबीयांनी धावपळ करत त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. हसत्या खेळत्या कुटुंबाचा आनंद एका क्षणात मावळला. नवरदेवाच्या मृत्यूची बातमी कळताच मांडवात एकच आक्रोश पसरला. वरातीसाठी येणारे लोक अत्यंयात्रेत सहभागी झाले. (Groom Dies Of Heart Attack)
मुंडावळ्या बांधत असताना तब्येत बिघडली
राम लाल यांचा मुलगा राजकमल याचे मंगळवारी लग्न होते. लग्नाची पूर्ण तयारी झाली होती. मुहूर्तावर लग्न मांडवात पोहोचण्यासाठी सगळे तयार होत होते. नववधूचे गाव अटैसा इथे जाण्यासाठी वरातही तयार होती. राजकमलदेखील वरात घेऊन जाण्यासाठी उत्सुक होता. नवरदेवाचा पोषाख खालून तो सजून बसला होता. मुंडावळ्या बांधत असताना अचानक नवरदेवाला अस्वस्थ वाटू लागले.
वाचाः नादुरुस्त शिवशाहीमध्ये चालकाने संपवले आयुष्य; आता समोर आले खळबळ उडवणारे कारण, महिला वाहक....
नवरदेवाला हृदयविकाराचा झटका
नवरदेवाची अचानक तब्येत बिघडली आणि तो खाली कोसळला. मुलाला अशा अवस्थेत पाहून नातेवाईकांनी त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. मुस्तफाबाद येथे असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात त्याला नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी राजकमलला मृत घोषित केले. डॉक्टरांनी म्हटलं आहे की, राजकमलचा मृत्यू हृदयविकाराचा झटका आल्याने झाला. या घटनेने लग्नघरात एकच शोककळा पसरली. मुलाच्या आई-वडिलांना मोठा धक्का बसला आहे. घटनेची माहिती मिळताच वधूपक्षातील लोकही राजकमल याच्या घरी पोहोचले.
वाचाः नाशिकः दार उघडताच समोर दिसले हादरवणारे दृश्य; आई-वडिलांच्या डोळ्यांसमोरच...
हसते-खेळते कुटुंब उद्ध्वस्त
वरातीत सहभागी होणारे लोक नवरदेवाच्या अत्ययांत्रेत पोहोचले होते. अत्यंत शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मुलाच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळं त्याचे वडिल खचले आहेत. स्मशानभूमीतच त्यांची अवस्था पाहून उपस्थितांना अश्रू अनावर झाले होते. आज जर मुलगा जिवंत असता तर घरात आनंदाचे वातावरण असते. मात्र, एका क्षणात हसते-खेळते कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे.
वाचाः आईला झोपेच्या गोळ्या दिल्या, नंतर बॉयफ्रेंड येताच घडलं असं काही की लेकीने जन्मदात्रीलाच संपवले