Shocking Story : देशभरात लग्नाचा माहोल सुरु आहे. जागोजागी ढोल ताशे नगाडे वाजतायत, लग्नाच्या वराती निघतातय. असे सर्व वातावरण सध्या सर्वदूर पाहायला मिळत आहे. अशात एका लग्नातील एक दु:खद घटना समोर आली आहे. या घटनेत एका वरातीत नाचत असलेल्या तरूणाला हार्ट अटॅक (Heart Attack) आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने सुख:द वातावरणावर दु:खाचा डोंगर कोसळल्याची घटना घडलीय. (groom friend heart attacked while dancing in wedding ceremony kanpur uttar pradesh shocking stoty) 


लग्नाचा जल्लोष 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका तरूणाचे लग्न (Wedding) ठरले होते. लग्नाची संपुर्ण तयारी झाली होती. नवरदेव तयार होऊन घोड्यावर बसला होता आणि वरात निघाली होती. तिकडे नवरी नवऱ्याच्या वरातीची वाट पाहत होती. तर इकडे नवऱ्याकडचे सर्वच मंडळी वरातीत तुफान नाचत होती. हळूहळू वरात पुढे जात असताना नाचण्यात आणखणीच मजा येत होती. या दरम्यानच एक धक्कादायक घटना घडली होती.


तरूणाला आला हार्ट अटॅक 


मित्राच्या लग्नात नाचत असताना अचानक एका तरूणाला हार्ट अटॅक (Heart Attack)आल्याची घटना घडली होती. या घटनेने वरातीतील नातेवाईकांना एकच धक्का बसला होता. कारण हा तरूण नाचता नाचता अचानक रस्त्यावर कोसळला होता. या घटनेनंतर नातेवाईकांनी तरूणाला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला.मात्र तो काय शुद्धीवर आला नाही. त्यामुळे वरातीसह लग्नावर दु:खाचा डोंगर कोसळला होता.


पोलीस काय म्हणाले?


पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, कडाक्याच्या थंडीत सर्वजण बँडबाजाच्या तालावर नाचत होते. या वरातीत अभय सचान (32) देखील होता. हा अभय सुरुवातीपासून शेवटपर्यंत नाचत होता. यावेळी नाचता नाचता त्याला हार्ट अटॅक (Heart Attack) आला होता. यामुळे तो नाचता नाचना जमीनीवर कोसळला होता. ही घटना पाहून त्याला लगेचच संजय गांधी मेमोरियल हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले होते.
 
दरम्यान ही घटना कानपूरच्या रेवामध्ये घडली आहे. या घटनेत तरूणाच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका (Heart Attack) मानले जात आहे.मात्र, पोलीस अद्याप शवविच्छेदन अहवालाच्या प्रतीक्षेत आहेत. या अहवालात नेमक काय समोर येते हे पाहावे लागणार आहे. मात्र या घटनेने लग्नावर शोककळा पसरली होती.