नवी दिल्ली: लग्न हे प्रत्येक जोडप्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि तितकाच अविस्मरणीय क्षण. पण, काही जोप्यांच्या बाबतीत मात्र, हा क्षण विचित्र आणि तितकाच चर्चेचा विषय. अशाच एका जोडप्याचा विवाह हा अनेकांसाठी चर्चेचा आणि तितकाच गमतीचा विषय  ठरला. पण, या जोडप्यांसाठी मात्र हा विवाह हृदयाचे ठोके वाढवणारा ठरला. घडले असे की, लग्नासाठी नटू थटून नवरा नवरी घरून  निघाले. त्यात नवऱ्याची स्वारी घोड्यावरून निघाली. नवरी बिचारी आगोदरच विवाहस्थळी पोहोचली. पत्ता नव्हात तो नवरदेवाचा.


बराच काळ झाला तरी नवरदेव विवाहस्थळी पोहोचलाच नाही


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

घरून घोड्यावर वाजत-गाजत निघालेला नवरदेव बराच काळ झाला तरी विवाहस्थळी पोहोचलाच नाही. त्यामुळे सर्वांनाच उत्सुकता  लागून राहिली. दरम्यान, बराच वेळ झाला मुहूर्ताची वेळही आली. आता तर, इतका वेळ झाला की, मुहूर्ताची वेळच टळून जातेकी काय असे वाटाय लागले. जवळपास सगळेच हैराण झाले. मग नवरदेवाची आणि त्याच्यासोबत निघालेल्या मित्रमंडळींचीही जोरदार शोधाशोध सुरू झाली. 


 नवरदेव हा घोड्यासह विहीरत


नवरदेव घोड्यावरून येण्याच्या मार्गावरून तपास सुरू केला असता धक्कादायक माहिती पुढे आली. जी ऐकूण सर्वांनाच धक्का बसला. ही माहिती अशी होती की, घोड्यावरून निघालेला नवरदेव हा घोड्यासह विहीरत पडला होता. घोड्यावर घातलेल्या खोगीरामुळे त्याचा पायही त्यात अडकून पडला. त्यामुळे घोडा आणि नवरदेव यांची विहीरीत चांगलीच धडपड सुरू होती. मात्र, सोबत असलेल्या वऱ्हाडी, मित्र आणि गावकरी मंडळींनी नवरदेव आणि घोडा अशा दोघांनाही विहिरीबाहेर काढले. दोघांचेही प्राण वाचले.



हा सगळा प्रकार घडल्यावर नवरेदव कसाबसा विवाहस्थळी पोहोचला आणि मग वधू-वरांचा विवाहही विधीवत पार पडला.