नवी दिल्ली : भारत हा एक विविध प्रथा आणि परंपरांचे पालन करणाऱ्या बहुआयामी लोकसंस्कृतीचा देश आहे. आजच्या विज्ञान युगातही या प्रथा आणि परंपरांचे पालन केले जाते. यातल्या काही परंपरा तर, मानवी जीवनावर, त्यांच्या लोकव्यवहारांवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या आहेत. उदा. मध्यप्रदेश आणि छत्तीसगढचेच घ्या ना. इथे काही लोकसमूह आणि समाजात विवाहाची एक अशी परंपरा जोपासली जाते की, ज्यात नवरदेवाला चक्क रक्त प्यावे लागते.


काय आहे प्रथा?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या दोन्ही राज्यांमधील दुर्गम भागात गौंड समाजाचे मोठ्या प्रमाणावर वास्तव्य आहे. या समाजातील लोक अत्यंत विचित्र अशा परंपरेचे आजही पालन करतात. ही प्रथा-परंपरा अशी की, या समाजातील ज्या तरूण, तरूणीचे जेव्हा लग्न ठरते. तेव्हा, या जोडप्यातील नवरदेवाला ही परंपरा पाळावी लागते. या परंपरेनुसार  नवरदेवाला विवाहापूर्वी कोणतेही एक जनावर मारावे लागेत. ते जनावर मारून त्याला त्या जनावराचे गरम रक्त प्राषण करावे लागते. परंपरेने चालत आलेली ही अट पार पडल्याशिवाय लग्नाचे पूढचे कोणतेच विधी केले जात नाहीत. तसेच, विवाह झाला असे मानलेही जात नाही.


बदलत्या समाजापासून हा समाज कोसो दूर


दरम्यान, खासकरून हे जनावर हे रानटी डूक्कर असते. हे डुक्कर शक्यतो नवरीकडचे लोक घेऊन येतात. लग्नाच्या अंतिम विधीपूर्वी नवरदेव हे डुक्कर मारतो. त्याचे रक्त पितो मगच लग्नाच्या पुढील विधिसाठी तयार होतो. दुर्दैव असे की, आजही या प्रदेशातील गौंड समाज तिककाच मागसलेला आहे. जेवढा काही वर्षांपूर्वी होता. बदलत्या जगाचे वारे आजही या समाजापासून कोसो दूर आहे. त्यामुळे आजही या समाजात पारंपरीक पद्धतीचे जीवनच जगले जाते.