Groom Left The House Before Marriage: दुसऱ्यादिवशी लग्न होतं, कुटुंबीय उत्साहात होते. नवरदेव लग्नासाठी फिशियल करायला म्हणून घराबाहेर पडला. पण मुहूर्ताची वेळ टळून गेली तरी तो काही परतला नाही.  ऐन वेळेला नवरदेवच गायब झाल्याने एकच गोंधळ निर्माण झाला. वधुपक्षाच्या कुटुंबीयांना ही गोष्ट कळताच त्यांनी लगेचच नवऱ्या मुलाचे घर गाठले. त्यानंतर पूर्ण दिवस पंचायत बसवण्यात आली व हा प्रश्न सोडवण्यात आला. 


लग्नाचा मांडव पडला होता


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तर प्रदेशमध्ये राहणाऱ्या तरुणाचे लग्न ठरवण्यात आले होते. ६ जून रोजी टिळा लावण्याचा कार्यक्रम झाला. 11 जून रोजी कुशीनगर जिल्ह्यातील फाजिलनगरमध्ये राहणार्या नववधुच्या गावात वरात निघणार होती. सगळी तयारी झाली होती. लग्नाचा मांडव पडला होता. बँड-बाजादेखील तयार होता. मात्र, वरात निघण्याच्या एक दिवस  आधी नवरामुलगा फेशियल करण्याच्या बहाण्याने घरातून फरार झाला. 


दुसऱ्यादिवशी लग्न होते. वरात निघण्याची वेळ झाली. सगळे नातेवाईकदेखील जमले होते. वरात देखण्यासाठी गावातील लोकही जमले होते. मात्र, तरीदेखील नवरदेव परतला नव्हता. लग्नाला अवघे काही तास बाकी असताना नवरदेव गायब झाल्याने सगळ्यांच्या चेहऱ्यावर चिंता पसरली होती. इथे वधुपक्षालादेखील नवरदेव लग्नातून पळून गेल्याची माहिती मिळाली.


नववधुसह तिच्या नातेवाईकांनी लगेचच नवरदेवाचे घर गाठले. तिथे गेल्यावर दोन्ही पक्षांमध्ये वादा-वादीदेखील झाली. वरपित्याने मी माझ्या छोट्या मुलाशी तुमच्या मुलीशी लग्न करुन देण्यास तयार आहे. मात्र, वधुपक्षाने ही तडजोड करण्यास नकार दिला. तसंच, टिळा लावताना देण्यात आलेले सर्व सामान व रोख रक्कम परत देण्याची मागणी केली. हेप्रकरण गावच्या पंचायतीसमोर मांडण्यात आले. 


गावच्या पंचायतीसमोर वधुपक्षाने दोन लाख रुपये आणि सर्व सामान परत देण्यात यावे, अशी मागणी केली. एका स्टॅम्प पेपरवर लिहून हे सर्व सामान परत करण्यात आले. त्यानंतरच सर्व प्रकरण थंड झाले. वरपक्षाने फर्निचर सेट, फ्रीज, टिव्ही, कुलर हे सर्व सामानदेखील परत केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नवरदेव गोरखपूर जिल्ह्यात एका कंपनीत मॅनेजर पदावर कार्यरत आहे. 


नवरदेवाचे एका तरुणीसोबत अफेअर होतं. म्हणूनच तो लग्नमांडवातून पळून गेला, अशी शंका गावकऱ्यासह नातेवाईकांनी व्यक्त केली. मात्र, नवरदेव अद्यापही घरी परतला नाहीये. तसंच, त्याचा फोनही स्विच ऑफ आहे. त्यामुळं त्याचे कुटुंबीय काळजीत आहेत. याप्रकरणी कुटुंबीयांनी पोलिसांतही तक्रार दाखल केली आहे.