नवी दिल्ली : शिवसेनेच्या लोकसभा गटनेतेपदी खासदार विनायक राऊत यांची नियुक्ती करण्यात आलीय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सहीनिशी एक पत्र संसदीय कामकाज मंत्र्यांना धाडण्यात आलंय. महत्त्वाचं म्हणजे पद वाटपात पुन्हा एकदा मुंबई-कोकणाला महत्त्व देण्यात आलंय असं म्हणावं लागेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 



लोकसभा निवडणूक २०१९ मध्ये रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून सेनेच्या राऊत यांनी नारायण राणेंचा गड उद्ध्वस्त करण्याची कामगिरी केलीय. यावेळी त्यांनी निलेश नारायण राणे यांचा १ लाख ७८ हजार ३२२ मतांनी पराभव केला होता. २०१४ च्या निवडणुकीतही याच मतदारसंघात राऊत यांनी विजय प्राप्त केला होता. केंद्रीय मंत्रिमंडळात राऊत यांना स्थान मिळू शकेल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. परंतु, तसं काही घडलं नाही. आता मात्र लोकसभेचं गडटनेतेपद राऊत यांना बहाल करण्यात आलंय.