`या` गोष्टींवरील जीएसटी कमी होण्याची शक्यता
सीएनजी आणि एटीएफ आता खऱ्या अर्थानं जीएसटीच्या अंतर्गत आणण्याचा प्रस्ताव येत्या २० तारखेला कौन्सिल समोर येणार आहे.
नवी दिल्ली: येत्या २० तारखेला होऊ घातलेल्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत विमानासाठी लागणारं एव्हिएशन टर्बाईन फ्यूअल आणि नैसर्गिक वायू म्हणजेच सीएनजी जीएसटी अंतर्गत येण्याची शक्यता आहे. १ जुलै २०१७ रोजी लागू करण्यात आलेल्या जीएसटी प्रणालीतून कच्चे तेल, पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि एटीएफ वगळण्यात आले आहे.
त्यापैकी सीएनजी आणि एटीएफ आता खऱ्या अर्थानं जीएसटीच्या अंतर्गत आणण्याचा प्रस्ताव येत्या २० तारखेला कौन्सिल समोर येणार आहे. सीएनजी आणि एटीएफ जीएसटीअंतर्गत आल्यास दोन्हीचे दर कमी होण्याची शक्यता आहे.