मुंबई : आपण साखरपुड्यात जी अंगढी पाहतो ती सर्वसाधारणपणे एक-दोन हिऱ्यांची असते. पाच ते सहा हिऱ्यांची अंगठीही आपण कदाचित पाहिली असेल. पण आम्ही तुम्हाला अशा एका अंगठीबद्दल सांगणार आहोत जे ऐकून तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल. म्हणूनच त्या अंगठीची गिनिज बुक वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आलीय. हा अंगठीनामा जगात इतर कुठे झाला नाहीए तर भारतातच गुजरातमध्ये झालायं. इथे चक्क ६,६९० हिऱ्यांची अंगठी बनलीयं. या अंगठीच जगभरातून कौतूक होतयं. गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डतर्फे या अंगठीचा व्हिडिओ नुकताच फेसबुकवर शेअर करण्यात आला आणि बघता बघता या व्हिडिओला चार लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले. 


कमळाची अंगठी 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


६,६९० हिऱ्यांची अंगठीला कमळाचा आकारा देण्यात आलायं. या कमळात दहा-बारा नव्हे तर ४८ हिरेजडीत पाकळ्या तुम्हाला पाहायला मिळतील. वरकरणी पाहता हे उमलणारं कमळं दिसतयं. रोझगोल्डमध्ये अठरा कॅरेटमध्ये ही अंगठी करण्यात आल्याचे सांगण्यात येतंय. हे सर्व साकारण्यासाठी त्याला ६ महिन्यांचा कालावधी लागलाय. 


किंमत 


'गिनिज बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये नोंद झाल्यानंतर या अंगठीच्या किंमतीबद्दल चर्चा रंगल्या होत्या. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये या अंगठीची किंमत ४,११,७८७ डॉलर्स इतकी आहे. याचा अर्थ भारतीय बाजारपेठेनुसार तब्बल २८ कोटी रुपये एवढी या अंगठीची किंमत आहे.  विशाल अग्रवाल आणि खुशबू अग्रवाल या दोन ज्वेलरी डिझायनर्सनी ही अंगठी साकारली आहे.