अहमदाबाद : गुजरातमध्ये भावनगर- अहमदाबाद महामार्गावर सिमेंटच्या गोण्यांनी भरलेला ट्रक उलटल्याने १९ जणांचा मृत्यू झाला. तर अपघातात ७ जण जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अपघाताचे वृत्त समजताच पोलीस आणि जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.


आज सकाळी सिमेंटच्या गोण्यांनी भरलेल्या ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रकला हा अपघात झाला. या भीषण अपघातात ट्रकमधील १९ जणांचा घटनास्थळी मृत्यू झाला. जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.