नवी दिल्ली : अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिलेल्या गुजरात विधानसभा निवडणूकीचे बिगूल अखेर वाजले. राज्य निवडणूक आयोगाने बुधवारी दुपारी विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही निवडणूक दोन टप्प्यात पार पडणार असून, पहिल्या टप्प्यासाठी ९ तर, दुसऱ्या टप्प्यासाठी १४ डिसेंबरला मतदान होईल. १८ डिसेंबरला  मतमोजणी होईल.  १८ डिसेंबरला गुजरातसोबत हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीचाही निकाल लागणार आहे.


निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करताना विद्यमान विधानसभा निवडणुकीचा कार्यकाळ २२ जानेवारी रोजी संपुष्टात येईल असेही निवडणूक आयोगाने स्पष्ट केले.  मुख्य निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त अचलकुमार जोती यांनी पत्रकार परिषद घेऊन गुजरात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम स्पष्ट केला. या निवडणुकीसाठी ५० हजार १२८ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रीया पार पडेल. मतदान केंद्रांवर ईव्हीएम, व्हीव्हीपॅट मशीनचा वापर केला जाणार असून, निवडणुकीसाठी आजपासून (बुधवारी)  आचारसंहिता लागू झाल्याचेही जोती यांनी स्पष्ट केले.


या वेळी गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी तब्बल  ४ कोटी ३३ लाख मतदार मतदानाचा हक्क बजावतील. मतदान सुरळीत पार पडण्यासाठी मतदान केंद्रं उपलब्द करून दिली जातील. त्यापैकी १०२ मतदान केंद्रांवर सर्व कर्मचारी या महिला असतील. या वेळी निवडणुक आयुक्तांनी उमेदवारांना खर्चाची मर्यादाही घालून दिली. त्यानुसार कोणत्याही उमेदवाराल २८ लाख रूपयांपेक्षा अधिक खर्च करता येणार नाही. हा खर्च करण्यासाठी उमेदवाराला बॅंके खाते उघडावे लागेल. तसेच, सर्व खर्च याच खात्यातून करणे उमेदवारांवर बंधनकारक असणार आहे.पहिल्या टप्प्यात ८९ जागांवर ९ डिसेंबररोजी मतदान होईल. यामध्ये १९ जिल्ह्यांचा समावेश आहे. दुसऱ्या टप्प्यात ९३ जागांवर १४ डिसेंबररोजी मतदान होणार असून यात १४ जिल्ह्यांचा समावेश आहे.