गुजरात विधानसभा निवडणूक : भाजपला फटका, कॉंग्रेसला जनतेचा हात, ओपिनियन पोल्सचा अंदाज
अनेक ओपिनिय पोल्सनी अंदाज व्यक्त केला आहे की, गुजरातमध्ये भाजप सत्ता राखेन. मात्र, भाजपच्या मतांमध्ये प्रचंड घट होईल.
नवी दिल्ली : गुजरात विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीने आता अत्युच्च टोक गाठले आहे. पहिल्या टप्प्यासाठी होत असलेल्या मतदानाला आता काहीच तास बाकी राहिले आहेत. त्यामुळे पहिल्या टप्प्यासाठी धडाडत असलेल्या प्रचाराच्या तोफा आज (गुरूवार, 7 डिसेंबर) थंड होतील. निवडणुकीत जनतेचा कौल कुणाला याचे उत्तर प्रत्यक्षात 18 डिसेंबरलाच मिळेल. पण, तोपर्यंत जवळपास 5 ओपिनिय पोल्सनी आपापले अंदाज व्यक्त केले आहेत. यात काही पोल्सनी भाजप मोठ्या फरकाने विजयी होईल असे म्हटले आहे. तर, काहींनी भाजप आणि कॉंग्रेसमध्ये काट्याची टक्कर होईल असे म्हटले आहे. एकूण पोल्सचा अंदाज तात्पूरता ग्राह्य्य मानायचा तर, गुरजातमध्ये भाजपचे सरकार बनेल. मात्र, नेहमीच्या तुलनेत भाजपच्या मतांची टक्केवारी मात्र प्रचंड घसरलेली दिसेल, असे निरिक्षण ओपिनियन पोल नोंदवताना दिसत आहेत.
एक नजर ओपिनियन पोल्सवर
टाईम्स नाऊ - कॉंग्रेस भाजपमध्ये चुरशीची लढत
गुजरात विधानसभा निवडणुकी दरम्यान, टाईम्स नाऊने केलेल्या सर्व्हेनुसार, भाजप विरूद्ध कॉंग्रेस अशी चुरशीची लढत पहायला मिळेल. दोन्ही पक्षांना 43 टक्के मते मिळतील. एकूण 182 विधानसभा जागांपैकी भाजपला 91 ते 99(+) तर कॉंग्रेसला 78 ते 86 जागा मिळतील. याच चॅनलने ऑगस्टमध्ये केलेल्या सर्वेत भाजपला आघाडी दाखवण्यात आली होती.
एबीपी न्यूज-सीएसडीएस : मतांची समान भागिदारी
एबीपी न्यूज आणि सीएसडीएसने केलेल्या सर्व्हेत भाजप, कॉंग्रेस दोन्ही पक्षांना मतदार समानच माप देतील. याचाच अर्थ असा की, कॉंग्रेस 43 टक्के तर, भाजपलाही 43 टक्के मतांची भागिदारी असेन. जागांची चर्चा करायची तर, कॉंग्रेससाठी आशादायी चित्र आहे. एबीपी न्यूजच्या अंतिम ओपिनियन पोल्सनुसार 82 जागा कॉंग्रेसला तर, 95 जागा भाजपला मिळू शकतात असे अनुमान आहे.
टीव्ही 9 : भाजप सत्ता राखेन
टीव्ही 9च्या सर्व्हेतच भाजप मोठी बाजी मारेन असे म्हटले आहे. टीव्ही 9च्या सर्व्हेनुसार भाजपला 47 टक्के तर, कॉंग्रेसला 42 टक्के मते मिळतील. तर, अन्य पक्षांना 11 टक्के मते मिळू शकतात. टीव्ही नाईननुसार भाजप जादूई आकडा पार करने. भाजपला 109 तर, कॉग्रेसला 73 जागा मिळतील असा अंदाज आहे. अपक्षांना फारसे यश मिळण्याची शक्यता नसल्याचा टीव्ही 9चा अंदाज आहे.
सहारा-सीएनएक्स: भाजप मारेन बाजी
सहारा-सीएनएक्सचे अनुमान असे की, कॉंग्रेस 41 टक्के तर भाजप 50 टक्के मते मिळवेन. जागांची चर्चा करायची तर, कॉंग्रेस 52 तर, भाजप स्पष्ट बहुमत मिळवत तब्बल 128 जागांवर बाजी मारेन असा सहारा-सीएनएक्सचा अंदाज आहे.
न्यूज नेशन : भाजपला स्पष्ट बहूमत
गुजरात विधानसभा निवडणूक ओपिनिय पोल्समध्ये भाजप सत्ता कायम राखेन. 182 पैकी, 131 ते 141 जागा जिंकत प्रचंड बहुमताने बाजप विजयी होईल. तर, कॉंग्रेसला 37 ते 47 जागांवर समाधान मानावे लागेन, असा अंदाज न्यूज नेशन व्यक्त करते.