अहमदाबाद : गुजरातमध्ये निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली असताना काँग्रेस आणि भाजपाचे एकमेकांवर आरोप सुरूच आहेत. भाजपानं काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींवर नवा आरोप केलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमेरिकन राजदुताशी केलेल्या चर्चेत भारतातला हिंदू दहशतवाद आणि गुजरातचे तत्कालिन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे लष्कर ए तोयबापेक्षा घातक असल्याचं विधान राहुल गांधींनी केल्याचा आरोप करण्यात आलाय. 


केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी काही वर्षांपूर्वी उजेडात आलेल्या विकिलिक्स वायर्सचा हवाला देऊन हा आरोप केलाय. तसंच काँग्रेसनं पाटिदार समाजाला दिलेलं आरक्षणाचं आश्वासन म्हणजे हीन राजकारण असल्याचं प्रसाद म्हणाले. 


घटनेनुसार 50 टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण देणं शक्य नसताना पाटिदारांसाठी आरक्षणाचा फॉर्म्युला काय आहे, ते काँग्रेसनं जाहीर करावं, असं आव्हानच त्यांनी दिलंय.