मोदींचा सी प्लेन प्रवासाचा वाद, सुरक्षा नियम धाब्यावर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सी प्लेननं केलेल्या प्रवासावरून आता राजकीय वादळ उठलं आहे. एका इंजिनाच्या विमानानं पंतप्रधानांसारखी अती महत्वाची व्यक्ती कशी काय प्रवास करू शकते, असा सवाल काँग्रेससह सर्वच राजकीय विरोधकांनी उपस्थित केला आहे.
अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सी प्लेननं केलेल्या प्रवासावरून आता राजकीय वादळ उठलं आहे. एका इंजिनाच्या विमानानं पंतप्रधानांसारखी अती महत्वाची व्यक्ती कशी काय प्रवास करू शकते, असा सवाल काँग्रेससह सर्वच राजकीय विरोधकांनी उपस्थित केला आहे.
पंतप्रधानांच्या जीवाला प्रवास धोकादायक
देशाच्या सुरक्षा मार्गदर्शक तत्वांनुसार राष्ट्रपती, पंतप्रधान यासारख्या अतिमहत्वाच्या व्यक्तींनी फक्त दोन इंजिनच्या विमानांनी प्रवास करणे बंधनकारक आहे. पण पंतप्रधानांनी काल वापरलेल्या सी प्लेनसाठी एकच इंजिन वापरलं जातं. त्यामुळे पंतप्रधानांच्या जीवाला या विमानातील प्रवास धोकादायक ठरू शकला असता. त्यामुळे गुजरात काँग्रेसचे प्रमुख नेते अर्जुन मोढवाढिया यांनी याप्रकरणी आक्षेप नोंदवला आहे.
नियमांचं उल्लंघन केलेलं नाही - भाजप
शिवाय मोदींनी निवडणूक प्रचारासाठी पंतप्रधानांचे सुरक्षा नियम धाब्यावर बसवल्याचाही आरोप केलाय. पण भाजपनं काँग्रेसचे सगळे आरोप फेटाळून लावले आहे. सी प्लेननं प्रवास करण्यात पंतप्रधानांनी कुठल्याही नियमांचं उल्लंघन केलेलं नाही, असं पक्षाचं म्हणणं आहे.