भरुच : Blast at Gujarat chemical factory : गुजरातमधील भरुचमध्ये रासायनिक कंपनीत मोठा स्फोट झाला. स्फोटानंतर परिसरात हादरा जाणवला. या स्फोटामुळे आग लागली. त्यानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. या स्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. हा स्फोट एका केमिकल कंपनीत झाला असून या स्फोटाचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या घटनेचा तसाप पोलीस करत आहेत. पहाटे तीनच्या सुमारास हा स्फोट झाला.


स्फोटाचा आवाज दूरपर्यंत  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रासायनिक कंपनीत झालेल्या स्फोटाचा आवाज दूरपर्यंत ऐकू आला. स्फोटामुळे 6 जणांचा जागीच मृत्यू झाला. भरुच येथील रासायनिक कंपनीत स्फोट झाल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक आग विझवण्यासाठी घटनास्थळी पोहोचले. अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात आली. 



पहाटे कंपनीत स्फोट झाला


रासायनिक कंपनीत आज सोमवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास स्फोट झाला. दहेज औद्योगिक परिसरात ही घटना घडली. स्फोटामुळे घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. हे ठिकाण अहमदाबादपासून 235 किमी अंतरावर आहे. भरुचच्या एसपी लीना पाटील यांनी सांगितले की, जेव्हा प्लांटचा स्फोट झाला तेव्हा रिअ‍ॅक्टरजवळ 6 लोक काम करत होते. डिस्टिलेशन प्रक्रियेदरम्यान स्फोट झाला.


स्फोटामुळे आग लागली, त्यात 6 जणांचा जळून मृत्यू झाला. त्यांनी सांगितले की, मृतांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून ते शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. कारखान्यातील आग विझवण्यात आली आहे. या अपघातात अन्य कोणीही जखमी झालेले नाही.