Operation NEET : NEET परीक्षेच्या घोटाळ्याचं गोध्रा कनेक्शन (Godhara Connection) उघडकीस आलंय. या सर्व घोटाळ्याचं केंद्र गुजरातमधील गोध्रा असल्याचं झी मीडियाच्या 'ऑपरेशन NEET'मधून समोर आलंय. आवडीच्या परीक्षा केंद्रासाठी 10-10 लाखांची लाच घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आलीये. ओडिशा, झारखंड, कर्नाटक या राज्यांतील विद्यार्थ्यांनी आपल्या घराजवळील परीक्षा केंद्राऐवजी चक्क गोध्रातील जलाराम केंद्राची (Jalaram Center) निवड केली. 26 विद्यार्थ्यांच्या ग्रुप पैकी 16 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी जलाराम केंद्र निवडलं. या विद्यार्थ्यांच्या नावाची यादीही  पोलिसांच्या हाती लागलीये. जलाराम परीक्षा केंद्रात कशा प्रकारे घोटाळा झाला पाहुयात...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

NEET घोटाळ्याचं गोध्रा केंद्र 
प्रश्न - लाच देणाऱ्या विद्यार्थ्यांना काय सांगितलं?
उत्तर- ज्या प्रश्नांची उत्तरं येत नाहीत ती कोरी सोडा


प्रश्न -विद्यार्थ्यांनी कोऱ्या सोडलेल्या प्रश्नांचं काय व्हायचं?
उत्तर-विद्यार्थ्यांनी कोरी सोडलेली उत्तरं सेंटरमधील तुषार भट्ट लिहित होता


प्रश्न - परीक्षा केंद्रावर कसा व्हायचा भ्रष्टाचार?
उत्तर- कॉपी पॅक करुन पाठवण्यासाठी 3 तास लागायचे
या वेळात OMR शीट भरली जायची


प्रश्न -विद्यार्थ्यांकडून किती रुपयांची लाच घेतली?
उत्तर- प्रत्येक विद्यार्थ्याकडून 10 लाख रुपये, एकूण 2.6 कोटी रुपये घेतले


परीक्षेत कॉपी करण्यासाठी तब्बल 10 लाखांचा दर फिक्स करण्यात आला होता. आरोपी आणि विद्यार्थ्यांमध्ये 12 कोटींहून अधिक रुपयांची देवाणघेवाण झाल्याची माहिती समोर आलीय. रॉय ओवरसीज कंपनी चालवणारे परशुराम रॉय आणि तुषार भट्ट या घोटाळ्याचे प्रमुख सूत्रधार असल्याचं चौकशीत उघड झालंय. NEET परीक्षेत घोटाळा करणाऱ्यांचा पर्दाफाश झाला असून चौघांना अटक करण्यात आलीय.


NEET परीक्षेतल्या घोटाळ्यामुळं अनेक विद्यार्थ्यांचं नुकसान झालंय. सुप्रीम कोर्टात याबाबतची सुनावणी सुरू आहे. परीक्षा रद्द करण्याची आणि सीबीआय चौकशीची मागणी याचिकेत करण्यात आलीय. आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडं सगळ्यांचं लक्ष लागलंय.


काय आहे नीट घोटाळा?
यंदाच्या नीट परीक्षा निकालात तब्बल 67 विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळाले. विशेष म्हणजे बहुतांश विद्यार्थी एकाच केंद्रावरील असल्याचं उघड झालं आहे. त्यामुळे या परीक्षेत घोळ झाल्याचा आरोप करण्यात येत असून, आता या प्रकरणानं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. हरियाणा, राजस्थान, कर्नाटक या आणि अशा केंद्रांवरील जवळपास 10- 15 च्या फरकानं विद्यार्थ्यांना 720 गुण मिळाले आहेत. एका केंद्रामध्ये किंवा त्याच्या आजुबाजूच्या केंद्रांमध्ये असणाऱ्या मुलांनाच पैकीच्या पैकी गुण मिळाले आहेत.